Goa Taxi Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: डिजिटल मीटरवरून टॅक्सीचालकांत फूट

डिजिटल मीटर्स बसविणे किंवा नाही हा त्याचा वैयक्तिक प्रश्‍न असू शकतो.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील (Goa) टॅक्सीचालकांना (Taxi Driver) डिजिटल मीटर्स (Digital meters) सक्तीचे करण्यात आले असताना टॅक्सीचालकांनी गोवा माईल्स (Goa Miles) किंवा ॲप ॲग्रिगेटर्स रद्द होत नाही तोपर्यंत हे मीटर्स न लावण्याचे आव्हान सरकारला दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत मीटर्स न बसविलेल्या टॅक्सींचे परमिट रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने टॅक्सीचालकांनी वाहतूकमंत्र्यांची भेट घेतली आणि हे मीटर्स बसविण्यासाठी मुदत मागितली. वाहतूक खात्याने त्यांना 15 दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे टॅक्सीचालकांमध्ये फूट पडली आहे.

गेल्या काही दिवसांपासून टॅक्सीचालकांनी कोणत्याही परिस्थितीत डिजिटल मीटर्स बसविले जाणार नाहीत, असा पवित्रा घेतला होता मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी न करणाऱ्या टॅक्सींचे परमिट रद्द करण्याचा इशारा वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिल्यानंतर पिवळ्या-काळ्या टॅक्सीचालकांनी त्यांची भेट घेतली. काही खासगी टुरिस्ट टॅक्सीचालकांनीही परमिट रद्द झाल्यास ते पुन्हा मिळवण्यासाठी अडचणी येतील, या भीतीने डिजिटल मीटर्स बसविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

यासंदर्भात वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले की, अनेक टॅक्सी चालक संकटात आहेत याचा विचार करूनच टॅक्सीचालकांच्या भाडेदरात वाढ करण्यात आली. डिजिटल मीटर्स बसविण्यासाठी फक्त 50 टक्के नोंदणी शुल्क ठेवण्यात आले.

हा वैयक्तिक प्रश्‍न

टॅक्सीचालक संघटित असल्याचे तसेच टॅक्सीचालकांची बाजू मांडणारे सुदीप ताम्हणकर यांना पिवळ्या - काळ्या टॅक्सीचालक डिजिटल मीटर्स बसविण्यास तयार झाले आहेत, त्यामुळे टॅक्सीचालकांमध्ये फूट पडली आहे का असा प्रश्‍न केला असता ते म्हणाले, त्यावर मी काय उत्तर देऊ शकतो. मीटर्स बसविणे किंवा नाही हा त्याचा वैयक्तिक प्रश्‍न असू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT