Power line Project Dainik Gomantak
गोवा

Goa Tamnar Project: ..हे तर सरकारचे डावपेच! पाच ‘सेझ’ना परवानगीचा आल्‍वारिस यांचा दावा; ‘तम्‍नार’कडून नोटीस जारी

GOA TAMNAR TRANSMISSION PROJECT LIMITED: राज्यातील पाच विशेष आर्थिक क्षेत्रांना (सेझ) परवानगी देण्यासाठी राज्य सरकारने ४४० केव्ही तम्नार वाहिनीवर अतिरिक्त २२० केव्ही वीज वाहिनी सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवल्याचा आरोप पर्यावरणवादी क्लॉड आल्वारिस यांनी केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

SEZ Expansion Plans With Goa Tamnar Project Face Claude Alvares Opposition

पणजी: राज्यातील पाच विशेष आर्थिक क्षेत्रांना (सेझ) परवानगी देण्यासाठी राज्य सरकारने ४४० केव्ही तम्नार वाहिनीवर अतिरिक्त २२० केव्ही वीज वाहिनी सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवल्याचा आरोप पर्यावरणवादी क्लॉड आल्वारिस यांनी केला आहे.

दरम्यान, गोवा तम्नार ट्रान्समिशन प्रोजेक्ट लिमिटेड (जीटीटीपीएल) कंपनीने गोव्यात वीजपुरवठा कोणत्याही क्षणी विद्युतभारीत केला जाणार असल्याने लोकांनी सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

या तम्नार प्रकल्पासंदर्भात वीज खात्यातील फाईल्सची तपासणी केल्यानंतर सरकारचे हे डावपेच उघडकीस आले आहेत. ही अतिरिक्त वीज वाहिनीच्या प्रस्तावासाठी सेझची कारणे देण्यात आली आहेत. २००८ साली लोकांचा जोरदार विरोध झाल्यानंतर तत्कालीन दिगंबर कामत सरकारने राज्यातील सेझ रद्द केले व भारत सरकारला मान्यताप्राप्त सेझ रद्द करण्याची विनंती केली होती. २००६ मध्ये गोवा सरकारने केंद्राकडे १५ सेझची शिफारस केली होती त्यापैकी ७ सेझ मंजूर करण्यात आले होते.

क्‍लॉड यांनी केलेले दावे

या अतिरिक्त वीज वाहिनीमुळे राज्यात बरेच काही घडणार आहे, हे गोमंतकीयांना माहीत नाही. वीज खात्यात गोवा तम्नार प्रकल्पाच्या फाईल्स पाहणी करताना अनेक उलघडे होत आहेत. खात्याने ४४० केव्ही वाहिनीवर अतिरिक्त २२० केव्ही वीज वाहिनी बसवण्याची मागणी केली आहे व त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी नियोजित ५ सेझची कारणे दिली आहेत.

काँग्रेसच्या सरकारच्या काळात सेझ रद्द करण्यात आले होते; मात्र या विद्यमान सरकारने सेझसाठी पुन्हा तयारी सुरू केली आहे. या सेझचा उल्लेख त्या फाईल्समध्ये आहे. त्याच्या प्रती मिळवण्यास माहिती हक्क कायद्याखाली अर्ज करणार आहोत. सरकार लोकांना गृहीत धरत आहेत.

गोव्यातील लोकांना फाईल्समध्ये लपून असलेल्या बाबींची माहिती नाही. येथील भोळे लोक सण-उत्सवात दंग आहेत असे क्लॉड आल्वारिस यांनी सांगितले. गोव्यासाठी योजना आहेत, जर मी त्या आता उघड केल्या तर लोक रागाने मंत्र्यांच्या घरघरी जाऊन त्यांना जाब विचारतील व त्यांना पदावरून हटवण्यास प्रयत्न सुरू करतील.

‘तम्‍नार’कडून नोटीस जारी

दरम्यान, गोवा तम्नार ट्रान्समिशन प्रोजेक्ट लिमिटेड (जीटीटीपीएल) कंपनीने एक नोटीस जारी केली आहे ज्यात काही विशिष्ट भागात लोकांना ४०० केव्ही व २२० केव्ही उच्च दाबाचा विजेचा पुरवठा सुरु होण्याच्या दृष्टीने त्यांच्या ट्रान्समिशन टॉवर आणि लाईनपासून दूर राहण्यास सांगितले आहे.

हा पुरवठा १२ ऑक्टोबर किंवा त्यानंतर केव्हाही सुरू केला जाऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्याच्या सूचनेकडे जनतेने लक्ष न दिल्यास कोणतीही हानी किंवा दुर्घटना घडल्यास त्याला कंपनी जबाबदार राहणार नाहीत, असे संकेत दिले आहेत.

४०० केव्ही वीज पुरवठा शेल्डे-म्हापसा वाहिनीद्वारे कोलवाळ, थिवी, हळदोणे, खोर्जुवे, मये, डिचोली, पिळगाव, कारापूर, विर्डी, आमोणा, नावेली, कुडणे, सुर्ला, पाले, उसगाव, गांजे, कणकिरे, मेळावली या गावांना होणार आहे. २२० केव्ही शेल्डे वाहिनीद्वारे बडोळी, कोडली, धारबांदोडा, सांगोड, आमोणा, शेल्डे, काकोडा, होडर, कुडचडे, सावर्डे व रुब्रे या गावांना वीज पुरवठा होईल.

२०१५ मध्ये गोव्यासाठी अतिरिक्त उर्जेचा स्रोत निर्माण करण्याची गोवा तम्नार टान्समिशन प्रोजेक्ट लिमिटेडची कल्पना होती. मात्र मार्च २०२४ मध्ये कर्नाटक सरकारने गोवा तम्नार ऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव नाकारला आणि धारवाड, हल्ल्याळ, दांडेली वन्यजीव व बेळगाव विभागातील १७४.६५२ हेक्टर वनजमीन वळवण्यास नकार दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT