गोवा

Goa Politics: नागरी जीवनमान उंचावले; राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई

Goa Politics: राज्यपालांचे अभिभाषण: मत्स्य व्यवसायात वृद्धी

दैनिक गोमन्तक

Goa Politics: राज्याच्या सकल उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 33 टक्के वाढ झाली आहे. दरडोई उत्पन्न 30 टक्क्याने वाढले आहे असे निरीक्षण राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी आज विधानसभेत नोंदवले. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली.

राज्यपालांनी 1 तास 6 मिनिटांच्या भाषणात सरकारने दिलेल्या आकडेवारीवर भर दिला. भाषणातील बहुतांश आकडेवारी ही नोव्हेंबर व डिसेंबर 2023 पर्यंतचीच होती. ते म्हणाले, पहिली ते आठवीपर्यंतच्या 1 लाख 63 हजार 123 विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार योजनेचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेखाली चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबर 2023 पर्यंत 39 कोटी 53 लाख 49 हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

गोवा भटकी जनावरे व्यवस्थापन योजना, 2013 (सुधारित) अंतर्गत नगरपालिका आणि पंचायती मिळून एकूण 16 स्थानिक संस्था समाविष्ट आहेत. त्यांना 2023-24 मध्ये 14.06 कोटी रुपयांचे अनुदान जारी करण्यात आले आहे. मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन म्हणून राज्यात 21 योजनांची अंमलबजावणी सुरू आहे.

चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबर 2023 पर्यंत या योजनांअंतर्गत 812 मच्छीमारांना 1 कोटी 87 लाख 11 हजार रुपये देण्यात आले आहेत. पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत 102 लाभार्थ्यांना एकूण 2.08 कोटी रुपये अर्थसाह्य मिळाले आहे.

राज्यपालांचे विधानसभा संकुलात आगमन झाल्यावर सभापती रमेश तवडकर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी त्यांचे स्वागत केले. पोलिसांनी मानवंदना दिल्यावर ते सन्मानपूर्वक राज्यपालांना विधानसभेत घेऊन गेले. राज्यपालांनी भाषण संपवून बाहेर पडताना काही आमदारांशी जाता जाता मोजक्याच शब्दांत संवादही साधला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT