Goans Surrenders Indian Passport  Dainik Gomantak
गोवा

Goa News: दुहेरी नागरिकत्व प्रश्न सोडवा

Goa News: स्वयंसेवी संस्थांची मागणी: लोहिया मैदानावर जनजागृती सभा

दैनिक गोमन्तक

Goa News: गोव्यातील सात स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन मडगावच्या लोहिया मैदानावर आयोजित केलेल्या जनजागृती सभेत अनेक ठराव मंजूर करण्यात आले. त्यात गोव्याचा नाश करणारे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

जातीय सलोखा राखण्याचा निर्धार, दुहेरी नागरिकत्व प्रश्न सोडविण्याची मागणी व निवडणुकीत ईव्हीएम मशीन रद्द करून मतपत्रिकांद्वारे निवडणूक घेण्याची मागणी करणारे ठराव मंजूर करण्यात आले.

सरकार ज्या हुकूमशाही पद्धतीने राज्य करीत आहे, त्याचा बिमोड करण्यासाठी सर्व गोमंतकीयांनी धर्म, जात विसरून एकत्र येणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत यावेळी वक्त्यांनी व्यक्त केले.

राजन घाटे यांनी पश्र्चिम घाटाचे रक्षण करणे आवश्यक असल्याची व त्याचबरोबर व्याघ्र क्षेत्र जाहीर करण्याची मागणी केली. सरकारने पश्र्चिम घाट नेस्तनाबूद करण्याचा जो घाट घातला आहे, त्यापासून लोकांनी जागृत राहून लढा देणे महत्त्वाचे असल्याचे आवाहन केले. जॅक मास्कारेन्हस यांनी गोव्यातील वाढत्या जमीन माफियांबद्दल चिंता व्यक्त केली.

पुढील काही वर्षांत गोमंतकीयांना आपल्याच राज्यात परके झाल्यासारखे रहावे लागेल, अशी भीती व्यक्त केली.

शंकर पोळजी यांनी पर्यावरणमंत्र्यावर टीका केली. गोव्याच्या रक्षणासाठी केवळ जनजागृती उपयोगाची नसून मोठे आंदोलन सुरू करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज, श्रीराम यांच्या नावाने सरकार व सरकार पक्षातील राजकारणी लोकांमध्ये दुफळी माजविण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे लोकांनी सावध रहावे, असा इशारा रामा काणकोणकर यांनी दिला.

त्यांनी समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर टीका करताना गोव्यातील जातीय सलोखा नष्ट करण्यासाठी वावरणाऱ्यांपैकी ते एक असल्याचे सांगितले.

कॅप्टन व्हिरियातो फर्नांडिस यांनी दाभोळी विमानतळाचा प्रश्र्न उपस्थित करताना सांगितले, की केवळ रिअल इस्टेटसाठी दाभोळी विमानतळ बंद करण्याचा सरकार विचार करीत आहे. दाभोळी विमानतळासाठी राखीव ठेवलेली पार्किंग जागासुद्धा विकल्याचा आरोप त्यांनी केला.

सभेचे सूत्रसंचालन कॉंग्रेस नेते व शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी केले. त्यांनी मडगावमधील अनेक प्रश्र्नांना वाचा फोडली.

‘‘सेव्ह गोवा’ आंदोलनाची पुन्हा गरज’

प्रो. प्रजल साखरदांडे यांनी म्हादई नदी कर्नाटकात वळविण्याचा प्रश्र्न उपस्थित केला. त्याचप्रमाणे पणजीतील स्मार्ट सिटी, कोळसा वाहतूक हे प्रश्र्न उपस्थित करून लोकांनी जागृत राहण्याची गरज असल्याचे सांगितले. सेव्ह गोवा आंदोलन परत एकदा सुरू करण्याची ही योग्य वेळ असल्याचेही ते म्हणाले.

‘पर्यावरणाचा नाश करण्यापासून सरकारला रोखा’

माजी आमदार एलिना साल्ढाना यांनी गोव्याचा वारसा, परंपरेवर कुऱ्हाड चालवून गोव्याचा निसर्ग व पर्यावरणाचा नाश करण्यापासून सरकारला रोखा, असे आवाहन जनतेला केले. त्यांनी कोळसा प्रदूषण व डबल ट्रेकिंगचा मुद्दा उपस्थित केला. लोकांची घरे मोडकळीस आल्याचे त्यांनी सांगितले. ज्या प्रमाणे कर्नाटक सरकार आपल्या जनतेचे रक्षण करते, त्याचप्रमाणे गोव्यातील सरकार का रक्षण करीत नाही, असा साधा व सरळ प्रश्र्न त्यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2024: इफ्फीत काय आणि कुठे पाहाल? संपूर्ण माहिती घ्या एका क्लिकवर..

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

Tuberculosis: क्षय रोगाला हद्दपार करण्यासाठी मिळाले स्टार बूस्ट!! वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा गोव्याचे 'टीबी ब्रँड ॲम्बेसेडर'

Mormugao Port: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगाम सुरू; एकाच दिवशी कॉर्डेलिया आणि जर्मनीहून जहाजं दाखल

SCROLL FOR NEXT