गोव्यातील काणकोण येथे भाजीपाला विक्री केंद्र  Dainik Gomantak
गोवा

Goa: भाजीपाल्‍यात परावलंबन आम्‍हीच ओढवले!

नैसर्गिक आरोग्‍यदायी भाजीकडे दुर्लक्ष : युवा पिढीलाही लागली आयात भाजीची चटक

दैनिक गोमन्तक

काणकोण: आम्हीच आम्हाला भाजीसाठी दुसऱ्या राज्यावर अवलंबून ठेवले आहे, अशी सध्‍या गोमंतकीयांची अवस्‍था आहे. पन्नास वर्षांपूर्वी बेळगाव व अन्य भागातून येणारी भाजी गोव्याच्या ग्रामीण भागातील रहिवाशांनी पाहिली नव्हती. या मातीत ऋतुमानानुसार निसर्गात उगवणाऱ्या व मातीचा गंध घेऊन पिकवल्या जाणाऱ्या भाज्यांवरच येथील समाज गुजराण करीत होता. त्यामुळे स्‍थानिक शेतकऱ्यांच्‍या अर्थकारणात वृद्धी झाली. ‘कॅच देम यंग’ या प्रमाणे आमच्या पुढच्या पिढीलाही त्या भाज्यांची चटक लागून येथील नैसर्गिक व या मातीचा गंध घेऊन उगवणाऱ्या भाज्या युवा पिढीच्या नावडत्या झाल्या. (Citizens of Goa are responsible for their dependence on other states for vegetables)

आज ज्यांचे वय 45-50 वर्षे आहे, त्या ग्रामीण भागातील रहिवाशांनी टॉमेटो, पेप्सीकॉन, कोबी, फ्लॉवर, बीट व अन्य संकरीत वाणाच्या भाज्यांची चव कधीच चाखली नव्हती. शहरी भागात काही प्रमाणात बेळगाव व अन्य भागातून येणाऱ्या भाज्यांचे सेवन तेथील रहिवासी करीत होते. कालांतराने परगावातून येणाऱ्या भाज्यांचे सेवन हे प्रतिष्ठेचे प्रतीक बनले. त्यामुळे प्रत्येकाची चव बदलली व आम्ही परगावातून येणाऱ्या भाजीचे गुलाम झालो. आज करमलघाट क्षेत्रातील वेगवेगळ्या भागात रस्त्याच्या कडेला बसून टायकिळा, तेरे (अळू), कुर्डू व अन्य भाज्यांची विक्री स्थानिक महिला विक्री करीत आहेत.

निसर्गाकडून देणगी, तरीही...

सध्‍याचे दिवस पावसाळी भाज्यांचे, तरीसुद्धा गोमंतकीय हंगामी भाज्यांचा नाद सोडून या मातीशी सबंध न सांगणाऱ्या भाज्यांना पसंती देत आहेत. निसर्गाकडून फुकटात मिळणाऱ्या भाज्या आरोग्यदायी आहेत. टायकिळा, शिरमंडळी, वात, अळू, कुड्डेकेची भाजी, शेवगा भाजी, चुड्डेची भाजी, अशा विविध प्रकारचा भाजीपाला निसर्गात उपलब्ध असतात. तरीही आम्ही कमनशिबी म्हणायला हवे. निसर्गाकडून एवढा भाजीपाल्‍याचा ठेवा वर्षभर आमच्या दिमतीला असताना, आम्ही दुसऱ्याकडे हात पसरत आहोत. पश्चिम घाटक्षेत्र रानभाज्यांनी समृद्ध आहे.

पावसाच्या पहिल्या सरीबरोबर निसर्गात टायकिळा उगवतो. याच काळात शेवग्याच्या झाडाला कोवळी पालवी येते, तिचाही उपयोग भाजी म्हणून करतात. शिरमंडळी, रानटी सुन्न, चुट्टेची भाजी, कुर्डूची भाजी अशा नानाविध आरोग्यदायी भाज्या निसर्गाकडून आयत्‍या उपलब्ध आहेत.

नैसर्गिक भाज्‍यांना हवी लोकमान्‍यता

टायकिळा कृमी नाशक आहे. त्याचबरोबर अनेक औषधी गुणांनी युक्त आहे. वात अळू हे वात विकारावर गुणकारी आहे. ग्रामीण भागातील रहिवाशांनी वेगवेगळ्या कारणांसाठी शहरात स्थलांतर केले आहे. तरीही त्यांच्या जिभेवर या भाज्यांची चव अजूनही आहे. त्यामुळे आज शहरी भागातही नैसर्गिक भाजीपाला उपलब्ध होत आहे. त्यामुळे या निसर्ग भाज्यांचे अर्थकारण बदलत आहे. या भाज्यांना सार्वत्रिक लोकमान्यता मिळण्यासाठी कृषी खात्याने पुढाकार घेण्याची गरज आहे. या भाजीपाल्‍यांची प्रदर्शने, पाककृती यांचे आयोजन करून हे साध्‍य करणे शक्य आहे आणि ती काळाची गरज आहे.

वयाच्या दहाव्या वर्षी टॉमेटो खाल्ला : अजय लोलयेकर.

टॉमेटो व अन्य भाज्या ग्रामीण भागात चाळीस वर्षांपूर्वी उपलब्ध होत नव्हत्या. वडिलांचे हॉटेल होते, त्यासाठी वडील कारवारला जाऊन टॉमेटो व अन्य भाज्या आणत होते. त्यामुळेच टॉमेटो आहारात आला, असे लोलये येथील माजी सरपंच व विद्यमान पंच अजय लोलयेकर यांनी सांगितले. सध्‍याची परिस्थिती पाहता आम्हीच आम्हाला भाजीसाठी परावलंबी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT