babush monserrate Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: हिंमत असेल तर बाबूशनी तत्काळ राजीनामा द्यावा!

Goa Politics: पर्रीकर समर्थकांचे आव्हान: वक्तव्याचा खरपूस समाचार

दैनिक गोमन्तक

Goa Politics: आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पणजीच्या आमदाराने (माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव न घेता) २५ वर्षांत शहराची वाट लावली असल्याचा आरोप केला होता. त्या वक्तव्याचा मनोहर पर्रीकरांच्या समर्थक माजी महापौर, माजी नगरसेवक महिलांनी निषेध केला आहे.

‘आमदार बाबूश, २०२७ ची वाट कशाला पाहताय, हिंमत असेल तर आत्ता राजीनामा द्या आणि निवडणूक लढवून दाखवा’, असे आव्हान पर्रीकर समर्थक महिलांच्यावतीने भाजपच्या प्रदेश महिला मोर्चाच्या माजी अध्यक्ष तथा माजी नगरसेवक शीतल नाईक यांनी दिले.

येथील महालक्ष्मी ट्रस्टच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी माजी महापौर वैदही नाईक, माजी नगरसेवक रेखा कांदे व इतर महिलांची उपस्थिती होती. माजी आमदाराने पणजीत कोणते प्रकल्प केले, ते दाखवावे असे आव्हान मोन्सेरात यांनी दिले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून या महिलांनी पर्रीकरांनी पणजीत केलेल्या ५३ विकासकामांची यादी समोर ठेवली.

पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामांना प्रत्यक्षात २०१६ पासून सुरवात झाली, मग मागील पाच वर्षे तुम्ही सरकारला या रखडलेल्या कामांबाबत का विचारणा केली नाही. आमदार होता तर स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालकांना हटविण्यासाठी तुम्हाला कोणी अडवले, असे शीतल नाईक यांनी बाबूश मोन्सेरात यांना उद्देशून सांगितले.

स्मार्ट सिटीच्या समितीवर आमदार मोन्सेरात आणि त्यांचे पुत्र तथा महापौर रोहित मोन्सेरात आहेत. महापौर स्मार्ट सिटीच्या बैठकीला जातात की नाही, हेच काही समजत नाही. स्वतःच्या अपयशाचे खापर पर्रीकरांच्या डोक्यावर फोडण्याचे काम मोन्सेरात करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

बाबूश यांचे प्रत्युत्तर...

आपल्याबाबत कोणीही उठावे आणि काहीही बोलावे, त्याकडे फारसे लक्ष देत नाही. एखाद्याविषयी बोलून उगाच कोणाला मोठे करण्याचा हा प्रकार आहे, असे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पर्रीकर यांच्या समर्थक महिलांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या टीकेला उत्तर देताना सांगितले.

तेव्हा बिशाद नव्हती

पत्रकार परिषदेत शीतल नाईक यांनी आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. त्या म्हणाल्या, मनोहर पर्रीकरांनी राज्यातील जनतेसाठी खूप काही करून ठेवले आहे. त्यांनी सुरू केलेल्या विविध सुविधा व योजनांचा लाभ राज्यातील जनता घेत आहे. पर्रीकर हयात असताना आमदार बाबूश भित्र्या मांजरासारखे बसत होते.

वक्तव्य मागे घ्यावे

पर्रीकर यांनी विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, तसेच देशपातळीवर संरक्षणमंत्री म्हणून केलेल्या कार्याचा आढावा यावेळी शीतल नाईक यांनी घेतला. याप्रसंगी रेखा कांदे यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यांनी पर्रीकर यांनी केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला आणि आमदार मोन्सेरात यांनी पर्रीकर यांच्याविषयी केलेले वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT