Cabo de Rama Fort Redevelopment Dainik Gomantak
गोवा

'काब द राम किल्ल्याचा विकास करताना विश्वासात घ्या'

किल्ल्याच्या विकासाच्या ब्ल्यू प्रिंटची ग्रामस्थांची मागणी; आमदार डिकॉस्टांसमवेत बैठक

दैनिक गोमन्तक

काणकोण : काब द राम किल्ल्याचा विकास करताना ग्रामस्थांना विश्वासात घ्या, अशी मागणी काब द राम किल्ल्याच्या आसपास राहणाऱ्या ग्रामस्थांनी केली आहे. 21 कोटी रुपये खर्चून या किल्ल्याचा विकास करण्यात येणार आहे, मात्र हा विकास कशाप्रकारे होणार, याबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ आहेत. त्यासाठी किल्ल्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट ग्रामस्थांसमोर ठेवावी,अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांनी केली.

मंगळवारी ग्रामस्थांनी केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा व हेरिटेज ॲक्शन ग्रूपच्या पदाधिकाऱ्यांना काब द राम किल्ल्याजवळ बोलावून बैठक घेतली. त्यावेळी आमदार डिकॉस्टा यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पुरातत्व खात्याचे मंत्री यांच्याशी यासंदर्भात चर्चा करणार असून स्थानिकांचे हित जपण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी उपस्थित नागरिकांनी किल्ल्याच्या विकासाला आमचा विरोध नाही, मात्र किल्ल्यात चर्च आहे. त्याठिकाणी धार्मिक प्रार्थना होतात त्याशिवाय किल्ल्यातून जाणाऱ्या काही पारंपरिक पायवाटा आहेत. किल्ल्याच्या विकासानंतर ग्रामस्थांच्या परंपरागत व्यवहारांवर निर्बंध येणार नाहीत, याची ग्वाही पुरातत्व खात्याने देणे गरजेचे आहे.

किल्ला परिसरात काहीच्या खासगी बागायती असून त्यांचेही हितरक्षण झाले पाहिजे, अशी मागणी यावेळी बागायत मालकांनी केली. या किल्ल्याच्या डागडुजीसाठी दोनदा निविदा काढण्यात आल्या डागडुजी केलेल्या किल्ल्याची तटबंदी एका वर्षातच कोसळली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांकडून करापोटी जमा केलेले 21 कोटी असे पाण्यात जाऊ नयेत, असे आमदार डिकॉस्टा यांनी सांगितले.
यावेळी गोवा हेरिटेज ॲक्शन ग्रुपचे डॉ.जॉर्सन फर्नांडिस,आर्किटेक्ट आल्तिनो कुयेलो, हेना पंडित तसेच श्रीमती गोस्वामी, इवान रिबेलो, पंच प्रभाकर वैज, दिशा वेळीप यांनी मते व्यक्त केली. किल्ल्यातील तळ्याचा परिसर सेटलमेंट झोन म्हणून निर्देशित केला असल्याने काही नागरिकांनी शंका व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT