Cipla Goa USFDA Observations  Google
गोवा

Cipla Share Price: गोव्यातील सिप्लाच्या प्लांटची USFDA कडून तपासणी; निरीक्षणाचा फटका, शेअर्स 2 टक्क्यांनी घसरले

USFDA Cipla Observations For Goa Facility: USFDA सोबत काम करु आणि सर्वसमावेशक पावले उचलू; सिप्ला कंपनीने दिले आश्वासन

गोमन्तक डिजिटल टीम

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने गोव्यातील सिप्ला कंपनीच्या उत्पादन प्लांटबाबत नोंदवलेल्या निरीक्षणाचा कंपनीच्या शेअर्सला फटका बसला आहे. USFDA ने 10 जून ते 21 जून या कालावधीत प्लांटच्या उत्पादन सुविधेची तपासणी करुन सहा निरीक्षणे नोंदवली.

यानंतर सिप्लाचे शेअर्स दोन टक्क्यांनी घसरले. कंपनीने USFDA सोबत काम करु आणि दिलेल्या वेळेत सर्वसमावेशक पावले उचलू, असे आश्वासन भागीदारांना दिले आहे.

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीनंतर सहा निरीक्षणे नोंदवली. याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर झाला. सिप्लाचे शेअर्स 1.95 टक्क्यांनी (30.05 रुपये) खाली येऊन 1,510.90 रुपयांवरती पोहोचले.

कंपनीला फॉर्म 483 मध्ये सहा निरीक्षणे प्राप्त झाली. त्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 1.22 लाख कोटी रुपयांवर घसरले. सिप्ला स्टॉकचा एक वर्षाचा बीटा 0.2 आहे.

फॉर्म 483, नियामक प्रक्रियेचा एक महत्त्वाचा घटक आहे. गुणवत्ता प्रणालीत काही कमतरता असेल किंवा अन्न, औषध किंवा सौंदर्यप्रसाधके याबाबतीत कायद्याचे उल्लंघन होत असेल तर फॉर्म 483 प्रत्यक्ष तपासणी झाल्यानंतर सर्वात शेवटी दिला जातो.

निरीक्षक या प्रक्रियेचा अहवाल देतात आणि पुरवठादारास या तपासणीचे स्पष्टीकरण द्यावे लागते. कंपनीकडे USFDA ला उत्तर देण्यासाठी 15 दिवसांचा अवधी दिला जातो.

या उत्तरात, कंपनीने USFDA द्वारे केलेल्या तपासणीचे निराकरण करण्यासाठी उचललेल्या पावलांचे स्पष्टीकरण द्यावे लागते.

दरम्यान, सिप्ला स्टॉक या वर्षी 7.07 टक्के वाढला आहे. एकूण 2.11 लाख समभागांनी बीएसईवर 28.50 कोटी रुपयांची उलाढाल केली.

19 जून 2024 रोजी, शेअरची किंमत (1,581.70) या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचली, तर 23 जून 2023 रोजी, ती (985.00) च्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली.

सध्या, स्टॉक त्याच्या 52-आठवड्यांच्या नीचांकीपेक्षा 4.48 टक्के कमी आणि 52-आठवड्यांच्या नीचांकी पेक्षा 53.39 टक्के जास्त आहे. मागील वर्षामध्ये शेअर्स 49 टक्के वाढले आहेत.

सिप्ला ही भारत, दक्षिण आफ्रिका, उत्तर अमेरिका आणि इतर नियंत्रित आणि उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये विस्तारित होत असलेली एक जागतिक फार्मा कंपनी आहे. कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे आहे.

भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या या औषध उत्पादक कंपनीची जगभरात 47 ठिकाणी उत्पादन केंद्रे आहेत आणि 86 देशांमध्ये त्यांची उत्पादने विकली जातात.

सदर कंपनीने एकत्रित निव्वळ नफ्यात 79 टक्के ची वाढ नोंदवून, 939.04 कोटी रुपयांवर 10 टक्के वाढ नोंदवली असून ती 10 टक्के वाढून जवळपास 6,163 कोटी रुपये झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT