IFFI 2023  Dainik Gomantak
गोवा

IFFI 2023 : सिनेप्रेमींना सन्मानाची वागणूक मिळावी! ‘सडेतोड नायक’ मध्ये मान्यवरांचे मत

IFFI 2023 : वर्षभर ‘इफ्फी’चा माहोल असावा

गोमन्तक डिजिटल टीम

IFFI 2023 : पणजी, आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे चित्रपटांचा उत्सव, असे मी मानते. उत्तमोत्तम चित्रपट येथे सिनेरसिकांच्या सहवासात पाहायला मिळतात.

मात्र, हा महोत्सव ज्या चित्रपटप्रेमींसाठी केला जातो, त्यांना सन्मानाची वागणूक मिळणे गरजेचे आहे, असे मत प्रा. रमिता गुरव यांनी व्यक्त केले.

त्या संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ या विशेष कार्यक्रमात बोलत होत्या. कला समीक्षक ज्ञानेश मोघे यांनी सहभाग घेतला होता.

मोघे म्हणाले,की ‘इफ्फी’च्या काळापुरताच सिनेमांचा उत्सव न होता गोवा मनोरंजन संस्थेद्वारे वर्षभर विविधांगी कार्यक्रम व्हावेत, वर्षभर तसा माहोल राहणे गरजेचे आहे.

सिनेमाबद्दल जाण वाढतेय !

‘इफ्फी’ला सुरूवात झाली त्यावेळी अगदी कमी प्रमाणात कलात्मक चित्रपट यायचे. परंतु हे चित्रपट पाहून माझ्यात एक प्रकारची स्फूर्ती यायची, चित्रपटात विशिष्ट दृश्‍य, रंग, आकार का आहे, याची जाण आपल्यात त्यातूनच निर्माण झाल्याचे ज्ञानेश मोघे यांनी सांगितले.

सिनेमा हा मनोरंजनाच्या पलिकडेही असतो, याची जाण आज अनेकांना या महोत्सवामुळे येऊ लागली, असेही ते म्हणाले.

तर काय उपयोग ?

इफ्फीत सहभागासाठी देशभरातून अनेक चित्रपट चाहते गोव्यात येतात. कोणी रजा टाकून येतो, कोणी पोटाला चिमटा काढून फक्त चित्रपट प्रेमापोटी येतो.

परंतु या चित्रपट चाहत्यांनाच योग्य स्थान मिळत नसेल तर त्याचा काय उपयोग ? गेल्यावर्षी अनेक चित्रपटगृहांत खाली खुर्च्या असतानाही रांगेत उभ्या चाहत्यांना आत प्रवेश दिला नाही,असे प्रा.रमिता गुरव म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

Mapusa: म्‍हापशात विक्रेत्यांचा रस्त्यावर 'कब्जा'; सगळीकडे अतिक्रमण, बेशिस्‍त पार्किंग; वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा

Surya Gochar 2026: नोकरदारांना प्रमोशन अन् व्यापाऱ्यांना बंपर नफा! सूर्याचं नक्षत्रांतर 5 राशींसाठी ठरणार लकी; काठोकाठ भरणार तिजोरी

SCROLL FOR NEXT