Goa Theater Dainik Gomantak
गोवा

Goa Theatres to Open: ‘एसओपी’ पाळा अन् चित्रपट पाहा

शुक्रवारी गोव्यातील चित्रपटगृह उघडणार , सिनेरसिकांना दिलासा, थिएटरवाले लागले कामाला!

दैनिक गोमन्तक

पणजी: घरात बसून कंटाळला असाल, तर आता मनोरंजनाची (Entertainment) दारे उघडी झाली आहेत. मात्र, त्यासा़ठी आपल्याला काही निर्बंध (Covid-19) पाळावेच लागतील. मुख्यमंत्र्यांनी (CM Pramod Sawant) राज्यातील चित्रपटगृहे (Goa Theater) ही 50 टक्के क्षमतेने खुली करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली सिनेमागृहांचे मालक तयारीच्या कामाला लागले आहेत. चित्रपट रसिकांसाठी हा थोडासा दिलासा ठरत असला तरी त्यांना काटेकोरपणे नियमावलीचे पालन करावेच लागेल.

कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मार्चपासून लागू केलेली संचारबंदी टप्प्याटप्प्याने उघडण्यात येत आहे. सोमवारपासून संचारबंदी वाढविण्यात आली असली तरी 50 टक्के आसन क्षमतेने सिनेमागृह सुरू करण्याची मुभा सिनेमागृह चालकाला देण्यात आली आहे. त्यामुळे सिनेमागृह मालक आणि प्रेक्षकांनाही प्रत्यक्ष सिनेमागृहात जाऊन सिनेमे पाहता येणार आहेत.

अनेक दिवस बंद असलेली प्रदर्शन यंत्रणा, यंत्र सामुग्री, साफसफाई यामुळे प्रत्यक्ष सिनेमा प्रदर्शनाची सुरवात शुक्रवारीच होणार आहे. देशभर सिनेमा खुल्या करण्याचा दिवस म्हणजेच शुक्रवार. आता हा शुक्रवारचा मुहूर्त राज्यातील सिनेमागृह सुरू करण्यासाठी निवडला आहे, अशी माहिती आयनॉक्सच्यावतीने देण्यात आली आहे. आयनॉक्सच्यावतीने राज्यात मडगाव, पर्वरी आणि पणजीमध्ये बहुभाषिक चित्रपटांचे प्रदर्शन होतात. यामध्ये इंग्रजी, हिंदी आणि मराठी चित्रपटांचा समावेश असतो.

आयनॉक्समध्येही तयारी सुरू

राज्य सरकारने पन्नास टक्के क्षमतेने चित्रपटगृह सुरू करण्याची मुभा दिली असल्याने आयनॉक्सने आपल्या चित्रपटगृहांमध्ये तशी व्यवस्था केली असून पन्नास टक्केच रसिकच चित्रपटगृहांमध्ये बसू शकतील अशी रचना केली आहे.

सिनेमागृहांना एसओपी

  • प्रवेशद्वारावर सानेटझायरची सोय असावी

  • रसिकांना मास्कची सक्ती

  • दोन खुर्च्यांमध्ये सुरक्षित अंतर

  • थर्मल गनच्या साह्याने प्रत्येकाची तपासणी

  • चित्रपटानंतर सभागृहाचे सॅनिटायझेशन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT