Goa Politics Churchill Alemao political retirement Dainik Gomantak
गोवा

चर्चिल आलेमाव राजकारणातून निवृत्त होणार?

आगामी 2022 गोवा विधानसभा निवडणूक शेवटची असल्याचं वक्तव्य

दैनिक गोमन्तक

पणजी : तृणमूल काँग्रेस नेते आणि माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. आगामी गोव्यात होऊ घातलेली 2022 ची विधानसभा आपली शेवटची निवडणूक असेल असं जाहीर केलं आहे. त्यामुळे आलेमाव यांच्या राजकीय निवृत्तीची चर्चा राजकीय गोटात रंगू लागली आहे. (Churchill Alemao News Updates)

दरम्यान, चर्चिल आलेमाव, लुईझींन फालेरो आणि आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे तीन आमदार तृणमूलच्या (TMC) बाजूने गेल्याने सासष्टी तालुक्यात किमान तीन जागा तृणमूलने (TMC) जिंकण्याची आशा ठेवली होती. मात्र रेजिनाल्ड यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यामुळे तृणमूल काँग्रेससमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यात राष्ट्रवादीतून (NCP) तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झालेले चर्चिल आलेमावही जरी निवडून आले तरी ते निवृत्तीच्या वाटेवर असल्याचं स्पष्ट झालं आहे.

राज्यात सध्या आलेमाव हे दुसरे नेते आहेत, जे राजकीय निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. याआधी काँग्रेसचे (Congress) पर्येतील आमदार आणि ज्येष्ठ नेते प्रतापसिंग राणे यांनीही राजकीय निवृत्तीची इच्छा व्यक्त केली आहे. असं असलं तरीही अद्याप त्यांनी निवडणुकीतून माघारही घेतलेली नाही. त्यामुळे पर्ये मतदारसंघात यंदा चुरस पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT