Goa Politics आलेमाव आणि शरद पवार यांची भेट Dainik Gomantak
गोवा

आलेमाव आणि शरद पवार यांच्या भेटीचे उद्या उघडणार गुढ

गोव्यातील राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी आज मुंबईत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यातील (Goa) राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी मुंबईत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. निवडणुकीसंदर्भात आमची चर्चा झाली असे सांगून येत्‍या शुक्रवारी त्‍याबाबत आपण सर्व काही स्‍पष्‍ट करणार असल्‍याचे आलेमाव यांनी सांगितले.

या भेटीवेळी पक्षाचे सरचिटणीस प्रफुल्ल पटेल, गोव्यातील नेते डॉ. प्रफुल्ल हेदे तसेच आलेमाव यांच्या कन्या वालांका आलेमाव या उपस्‍थिती होती. शरद पवार यांनी आपल्याला मुंबईत बोलावून घेतले होते. त्यानुसार आमची भेट झाली. येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर युती करायची की नाही यावरही विचारविनिमय झाला, असे आलेमाव यांनी सांगितले.

दरम्‍यान, काँग्रेसबरोबर युती होणार की नाही याबाबत येत्‍या दहा दिवसांत पक्षाने भूमिका स्पष्ट न केल्यास आपण आपला निर्णय घेण्यास मोकळे आहोत अशी भूमिका यापूर्वी चर्चिल आलेमाव यांनी घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली असल्याने त्‍यात नेमकी काय चर्चा झाली याबद्दल उत्सुकता आहे. मात्र शुक्रवारी गोव्यात आल्यावरच आपण सर्व काही स्‍पष्‍ट करू असे सांगून आलेमाव यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. त्‍यामुळे उत्‍सुकता आणखी ताणली गेली आहे.

वालांकाच्‍या उमेदवारीसाठी धडपड

चर्चिल आलेमाव यांनी आज शरद पवार यांची भेट घेण्यामागे त्यांची कन्या वालांका आलेमाव हिला नावेलीची उमेदवारी मिळावी हासुद्धा हेतू होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. स्वतःला बाणावली आणि वालांकाला नावेलीची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी आलेमाव यांनी केली आहे. दरम्‍यान, नावेलीत राष्ट्रवादीची उमेदवारी न मिळाल्यास वालांका हिने अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी ठेवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT