Airoplane Dainik Gomantak
गोवा

Goa Flight: नववर्षाच्या तोंडावर खिशाला चाट! गोव्याची हवाई सफर महागली; 'तोबा गर्दी'चा परिणाम

Goa Flight Ticket Fare: नाताळ तसेच नववर्ष साजरे करण्यासाठी गोव्‍यात येणाऱ्या पर्यटकांच्‍या संख्‍येत वाढ झाली आहे. मुंबई, दिल्‍ली आणि बंगळुरू या तीन महानगरांतून गोव्‍यात येणाऱ्या पर्यटकांची संख्‍या दुप्‍पट झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Rising airfares for Goa

मडगाव: नाताळ तसेच नववर्ष साजरे करण्यासाठी गोव्‍यात येणाऱ्या पर्यटकांच्‍या संख्‍येत वाढ झाली आहे. मुंबई, दिल्‍ली आणि बंगळुरू या तीन महानगरांतून गोव्‍यात येणाऱ्या पर्यटकांची संख्‍या दुप्‍पट झाली आहे. त्‍यामुळे विमानांच्‍या भाड्यातही भरमसाट वाढ करण्‍यात आली आहे.

३१ डिसेंबरला गोव्‍यात येण्‍यासाठी मुंबई-गोवा विमान तिकीट दर १५ हजार रुपये, तर दिल्‍ली-गोवा विमान तिकीट २१ हजार रुपयांच्‍या आसपास जाण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जाते. ख्रिसमसला गोव्‍यात येणाऱ्या पर्यटकांची संख्‍या वाढण्‍याची शक्‍यता लक्षात धरून मुंबई-गोवा विमान तिकीट ९ हजारांवर पोचली होती.

मात्र, आज हे दर पुन्‍हा खाली उतरून अडीच हजार रुपयांच्‍या आसपास स्‍थिर झाले होते. पण ३० आणि ३१ डिसेंबर रोजी गोव्‍यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येणार असल्‍याने या दरात वाढ होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जाते. बंगळुरू-गोवा विमानाचे तिकीट ९ हजार रुपयांच्‍या आसपास जाण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जाते.

गोव्‍यात दर शनिवार आणि रविवारी कॅसिनोत जुगार खेळण्‍यासाठी दिल्‍ली आणि बंगळुरूहून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात.

‘वीकेंड’लाही दरांत वाढ

वास्‍को येथील विन्‍सन ट्रॅव्‍हल्‍स आस्‍थापनाचे मालक संजय शेट्ये यांनी दिलेल्‍या माहितीप्रमाणे, सध्‍या गोव्‍यात पर्यटन हंगाम सुरू झाल्‍याने गोव्‍यात येणाऱ्या विमान कंपन्‍यांनी दर वाढविले आहेत. फक्‍त ३१ डिसेंबरलाच नव्‍हे, तर आता दर शनिवार व रविवारी गोव्‍यात येणाऱ्या विमानांचे तिकीट दर वाढलेलेच असतात. प्रत्‍येक ‘वीकेंड’ला गोवा-मुंबई विमानाचे तिकीट ९ हजार रुपयांच्‍या आसपास विकले जाते. आता ३१ डिसेंबरला या दरात आणखी ३० टक्‍क्‍यांनी वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT