Goa Governor p. s. sreedharan pillai Dainik Gomantak
गोवा

Goa Governor: 'गोव्यात ख्रिश्चन लोकसंख्या घटली, मुस्लीम वाढले'; राज्यपालांच्या वक्तव्याने वाद

Goa Christian And Muslim Population: पिल्लई यांच्या या वक्तव्यावरुन वाद झाल्यानंतर त्यांनी वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हणत यु-टर्न घेतला.

Pramod Yadav

पणजी: गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फोडले आहे. पिल्लई यांनी गोव्यातील ख्रिश्चन आणि मुस्लीम लोकसंख्येवरुन वक्तव्य केलंय. गोव्यातील ख्रिश्चन लोकसंख्या कमी होत असून, मुस्लीम लोकसंख्या वाढल्याचा दावा पिल्लई यांनी रविवारी (०८ ऑगस्ट) एका कार्यक्रमात केरळमध्ये केला.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई केरळमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. 'गोव्यात ख्रिश्चनांच्या लोकसंख्येत मोठी घट झालीय. तर, मुस्लिमांची संख्या पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे.'

'गोव्यातील ख्रिश्चन लोकसंख्या पूर्वीच्या 36 टक्क्यांवरून 25 टक्क्यांवर आली आहे. मी एका ज्येष्ठ पाद्रीशी बोललो. मी त्यांना सांगितले की कॅथोलिक समुदायाच्या सदस्यांची टक्केवारी 25 टक्के कमी झाली आहे, तर इस्लामिक समुदायाच्या सदस्यांची टक्केवारी पूर्वीच्या तीन टक्क्यांवरून 12 टक्के झाली आहे', असे पिल्लई म्हणाले.

ख्रिश्चन समुदायातील सदस्यांना या संदर्भात सकारात्मक पद्धतीने अभ्यास करण्यास सांगितले आहे, असेही पाद्रीला सल्ला दिल्याचे पिल्लई यांनी कार्यक्रमात सांगितले.

पिल्लई यांच्या या वक्तव्यावरुन वाद झाल्यानंतर त्यांनी वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हणत यु-टर्न घेतला. माझ्या बोलण्याचा अर्थ 'टॅलेंट ड्रेन' होता असे म्हणत त्यांनी वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले.

'माझ्या विधानावर काही माध्यम संस्था वाद निर्माण करत असल्याचे मी पाहिलं. मी लोकसंख्या किंवा कोणत्याही विशिष्ट समुदायाबद्दल बोलत नव्हतो. गोव्यातील ख्रिश्चन सदस्यांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी झाली आहे. याची विविध कारणे आहेत, त्यातील एक कारण म्हणजे ब्रेन ड्रेन आहे', असे पिल्लई म्हणाले.

ख्रिश्चन समाजातील काही पाद्री मला भेटले आणि त्यांना मी काही बातम्यांचा संदर्भ दिला. मी त्यांना त्याचा अभ्यास करण्यास सांगितले. यात ब्रेन ड्रेनचा संदर्भ होता, असे पिल्लई यांनी दुसऱ्या एका कार्यक्रमात स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT