Chorla Ghat Traffic Dainik Gomantak
गोवा

Chorla Ghat: रस्त्याच्या मधोमध बंद पडला ट्रक; चोर्ला घाटात चार तास वाहतूक खोळंबली

घाटात जवळ पास दोन्ही बाजूला 200 च्या वर गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या.

गोमन्तक डिजिटल टीम

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात आज (गुरुवारी) संध्याकाळी रस्त्याच्या मधोमध काँक्रिट वाहतूक करणार ट्रक बंद पडल्याने दोन्ही बाजूनी वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. जवळ पास दोन्ही बाजूला 200 च्या वर गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या.

कणकुंबी जवळ डेल्टा हॉटेलच्या बाजूला ट्रक बंद पडला होता. यामुळे घाटात तब्बल चार तास वाहतूक खोळंबली होती.

Chorla Ghat Traffic

गोव्यावरून बेळगावला जाण्यासाठी चोर्ला घाट या मार्गावरुन जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक हाच रस्ता पत्करतात. कर्नाटक हदितला रस्ता पुर्ण पणे खराब झालेला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असताना सुद्धा नागरिक याच रस्ताचा अवलंब करतात.

Chorla Ghat Traffic

अशावेळी हा रस्ता नको रे बाबा असे उद्गार लोकांच्या मुखातून बाहेर पडले. यात परत माघारी फिरावे म्हंटले तर एकेरी रस्ता. " ना घर का ना घाट का " अशी परिस्थिती लोकांची झाली होती. नंतर उशीरा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanpur Plane Crash: कानपूरमध्ये मोठी विमान दुर्घटना! पायलट अन् सह-पायलटचा जागीच मृत्यू; परिसरात खळबळ VIDEO

Goa Police: पोलिसांचा धाक हवा, भीती नको! मायणा-कुडतरीपासून-फोंड्यापर्यंतच्या घटनांनी 'खाकी'च्या कार्यपद्धतीवर गंभीर सवाल

BCCIचा मोठा निर्णय! सेहवाग, द्रविडच्या सुपुत्रांची टीम इंडियात ग्रँड एन्ट्री; संघाची धुरा कोणाच्या हाती?

Tilari Canal: तिळारी कालव्याच्या रखडलेल्या कामाला अखेर गती! गोवा देणार 75 टक्के निधी तर महाराष्ट्राचा 25 टक्के वाटा; 1 सप्टेंबरपासून पाणीपुरवठा

VIDEO: 10व्या मजल्यावरुन थेट मृत्यूच्या दाढेत, पण... 24 वर्षीय नवविवाहितेचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार व्हायरल; मुंबईतील चक्रावणारी घटना

SCROLL FOR NEXT