Pramod Sawant 

 

Dainik Gomantak 

गोवा

पुढचं सरकार जबाबदारीने निवडा, मुख्यमंत्र्यांचं गोमंतकीयांना आवाहन

समृद्धी आणणारं भाजपचं सरकार राज्यात सत्तेत येईल आणि गोव्याची जनताच ते आणेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमन्तक

फोंडा: राज्याच्या विकासासाठी सत्ताधारी भाजप सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याला गोमंतकीय जनता नक्कीच साथ देईल असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. फोंड्यात आयोजित राज्य सहकार पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरकारने गेल्या वर्षात केलेल्या कामगिरीचा आलेख उपस्थितांसमोर मांडला.

भाजप (BJP) सरकार हे संवेदनशील सरकार असून प्रत्येकाची दखल या सरकारने घेतलेली आहे. त्यामुळे पुढील सरकार निवडताना ते काळजीपूर्वक आणि जबाबदारीने निवडा असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी गोमंतकीय जनतेला केलं आहे. तसंच समृद्धी आणणारं भाजपचं सरकार राज्यात सत्तेत येईल आणि गोव्याची जनताच ते आणेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या सहकार पुरस्कार वितरण कार्यक्रमावेळी फोंड्यात मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) पंतप्रधानांचंही कौतुक केलं. जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) विश्वनेता अशी ओळख आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात विकासाची घोडदौड सुरुच राहणार असंही मुख्यमंत्री पुढे म्हणाले. सहकार पुरस्काराने गौरव झालेल्यांचंही मुख्यमंत्र्यांनी तोंडभरुन कौतुक केलं.

कोणावरही घसरायचं नाही, त्यामुळे मोजकंच बोलतो असं म्हणत राज्याच्या विकासासाठी आणखी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. गोमंतकीय जनतेची आपल्याला कायम साथ मिळाली आहे, यापुढेही ती मिळेल असा विश्वासही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT