Gas Leakage At Merces Goa Google
गोवा

Gas Leakage At Merces: ‘क्लोरिन गळती’मुळे मेरशीत सहाजण अत्यवस्थ

Chlorine Gas Leakage: ५० हून अधिकजण इस्पितळात दाखल; दोन ‘गॅस सिलिंडर’ हलविले सुरक्षित ठिकाणी

गोमन्तक डिजिटल टीम

मेरशी येथील भंगार अड्ड्याच्या (स्क्रॅपयार्ड) ठिकाणी असलेल्या सिलिंडरमधून क्लोरिन गॅस गळतीमुळे तेथील मजूर व शेजारी असलेले रहिवासी मिळून सहाजण अत्यवस्थ झाल्याने त्यांना गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

अग्निशमन दलाला यासंदर्भात सकाळी ८ वा. माहिती मिळाल्यावर घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. गॅस गळती झालेल्या एक सिलिंडरसह तीन सिलिंडर खोर्ली येथे ‘डेक्कन’ कंपनीमध्ये सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती पणजी अग्निशमन दलाचे अधिकारी रूपेश सावंत यांनी दिली.

मेरशी येथे असलेल्या भंगारअड्ड्याच्या ठिकाणावरून बुधवार, २६ रोजी सायंकाळपासून ब्लिचिंग पावडरसारखा वास तेथे आजूबाजूला राहत असलेल्या रहिवाशांना येत होता.

भंगारअड्डा असल्याने या रहिवाशांनी त्याची गंभीर दखल घेतली नाही. गुरुवारी सकाळी या वासाचे प्रमाण वाढून भंगारअड्ड्यातील मजूर तसेच तेथील रहिवाशांना त्याचा त्रास होऊ लागला. काहींना श्‍वास घेणेही मुश्‍कील होऊ लागले. त्यामुळे या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली.

सुमारे ५० हून अधिकजणांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी त्यांना तेथील काही रहिवाशांनी खासगी वाहनाने व १०८ रुग्णवाहिकेने गोमेकॉ इस्पितळात दाखल केले. या भंगारअड्ड्यामध्ये असलेल्या तीन क्लोरिन सिलिंडरपैकी एकाला गळती लागली होती त्यामुळे भंगारअड्ड्याबाहेर हा वास पसरला होता.

गॅस हाताळणी करणाऱ्या खोर्लीतील डेक्कन कंपनीच्या कर्मचाऱ्यांची ही गळती थांबवण्यासाठी व ते सिलिंडिर सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी मदत घेण्यात आली. प्रत्येक क्लोरिन गॅस सिलिंडर हा ५० किलो क्षमतेचा होता.

पंचायतीकडून माहिती मागणार

या बेकायदेशीर भंगारअड्ड्याच्या मालकाला मेरशी पंचायतीने कारणेदाखवा नोटीस बजावलेली आहे. मात्र, अजून कारवाई केलेली नाही. या भंगारअड्ड्यामध्ये असलेले हे जुने क्लोरिन गॅस सिलिंडर त्याने कोठून आणले तसेच ते तेथे ठेवण्यासाठी आवश्‍यक परवाने घेतले होते का, याची माहिती अग्निशमन दला पंचायतीकडे पत्र पाठवून मागणार आहे, अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी रूपेश सावंत यांनी दिली.

पंचायतीला आता आली जाग

या भंगारअड्ड्यामध्ये ठेवण्यात आलेल्या सिलिंडरमधील क्लोरिन गॅस गळतीच्या घटनेनंतर मेरशी पंचायतीला जाग आली आहे. हा बेकायदेशीर भंगारअड्डा तेथून हटवण्याची नोटीस पंचायतीने बजावली आहे. यापूर्वी या भंगारअड्ड्याप्रकरणी स्थानिकांनी तक्रारी करूनही कोणतीच कारवाई पंचायतीकडून झाली नव्हती. अग्निशमन दलानेही याप्रकरणी पंचायतीकडे परवानगीची प्रत मागितल्याने कारवाईची पावले उचलली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT