Dainik Gomantak
गोवा

Chlorine Gas Leak At Assonora: सलग दुसऱ्या दिवशी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात क्लोरीन गळती

सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Akshay Nirmale

Chlorine Gas Leak At Assonora Water Treatment Plant: डिचोली तालुक्यातील अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी क्लोरीन वायुची गळती झाली. अग्निशमन दलाला याबाबत माहिती देण्यात आली असून डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

दरम्यान, गुरूवारी देखील येथे क्लोरिन वायुची गळती झाली होती. तसेच मंगळवारी देखील वायू गळती झाली होती. वारंवार असे प्रकार घडत असल्याने येथील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गुरूवारी ‘क्लोरीन’ वायूने भरलेल्या सिलिंडरमधून गॅसची गळती झाली. कॉक मोडल्याने त्यातून गॅस गळती होत असल्याचे निदर्शनास आले होते. डिचोली अग्निशमन दलाचे जवान तसेच तज्ज्ञांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करुन गॅसची गळती नियंत्रणात आणली होती.

त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. पण, त्यासाठी अग्निशमनच्या जवानांना पाचहून अधिक तास प्रयत्न करावे लागले होते. क्लोरीन मुळे परिसरातील झाडेझुडपे करपून गेली होती. गुरूवारी अग्निशमन दलातर्फे खोर्ली येथील ‘डीक्केन’ केमिकल्सच्या तज्ज्ञ पथकाला बोलावले होते. या पथकाला साडे तीनच्या सुमारास गॅस गळती रोखली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT