Chitrasangam 2024 At Ujwal Art Gallery Vagator Goa
वागातोर येतील उज्वल आर्ट गॅलरीमध्ये 'चित्रसंगम 2024' या राष्ट्रीय कला प्रदर्शनाचे उद्घाटन 16 नोव्हेंबर रोजी झाले. या प्रदर्शनातील कलाकृतींची निवड गोव्याचे प्रसिद्ध कला समीक्षक नागेश राव सरदेसाई यांनी केले आहे.
या प्रदर्शनात गोव्यातील तसेच भारतातील प्रतिभावंत चित्रकारांची चित्रे मांडण्यात आली आहेत. हे प्रदर्शन 25 नोव्हेंबरपर्यन्त चालू असेल.
उज्वला आर्ट गॅलरीला यंदा दहा वर्षे पूर्ण होत आहेत. अगदी सुरुवातीच्या काळापासून मी त्यांच्याबरोबर आहे. चित्रे आणि चित्रकला प्रदर्शनाच्या आयोजनासंबंधात वेळोवेळी ते माझा सल्ला घेत असतात. गॅलरीच्या दशकपूर्ती निमित्ताने ते आयोजित करत असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील कला प्रदर्शनातील चित्रे मी क्युरेट करावी अशी विनंती त्यांच्याकडून मला करण्यात आली.
गोव्याचे एक नामवंत चित्रकार दामोदर मडगावकर यांना सहाय्यासाठी घेऊन मी हे प्रदर्शन क्युरेट केले आहे. या प्रदर्शनात चित्रकलेचे औपचारिक शिक्षण घेतलेल्या तसेच स्वयंशिक्षित चित्रकारांच्या कलाकृतींची निवड करण्यात आली आहे. अर्थात चांगल्या चित्रकारसाठी अशा प्रकारचे निकष फारसे महत्त्वाचे नसतात.
या प्रदर्शनात 17 चित्रकारांचा समावेश आहे. गोव्यातील काही जेष्ठ तसेच उल्लेखनीय चित्रकार तसेच अन्य राज्यातील महत्त्वाचे चित्रकार या प्रदर्शनाचा भाग आहेत. या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात चित्रकाराकडून प्रात्यक्षिक सादर व्हावे असे ठरले आणि विक्रम परांजपे यांनी ते मान्य करून चित्रकलेचे छान असे प्रात्यक्षिक दिले. नागेश राव सरदेसाई, कला समीक्षक, क्युरेटर यांनी ही माहिती दिली.
योलांडा डिसोजा (गोवा), विभा सिंग (उत्तर प्रदेश), अजय कोठावळे (गोवा), कलानंद बांबोळकर (गोवा), निलेश हजारे (गोवा), गोविंद सिलीमखान (गोवा), हर्षदा केरकर सोनक (गोवा), किरण हणमशट (कर्नाटक), सचिन उपाध्ये (कर्नाटक), शिरीष देशपांडे (कर्नाटक), सुभाष बाहुलकर (महाराष्ट्र), विक्रम परांजपे (महाराष्ट्र), अरुण हरमलकर (गोवा), संदेश गवंडळकर (गोवा), निलेश आजगावकर (गोवा), मोहित नाईक (गोवा) आणि दामोदर मडगावकर (गोवा),
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.