हर्रो... हर्रो...च्या गजरात ‘बारस’ उत्सव दिमाखात साजरा..

गोमन्तक डिजिटल टीम

‘बारस’ उत्सव

वायंगण शेतीला प्रारंभ करण्यापूर्वी शेतांच्या, शेतकऱ्यांच्या, सामान्यांच्या संरक्षणासाठी प्रार्थना करण्याचा मुहूर्त म्हणजेच ‘बारस’ उत्सव.

Baras Utsav|Baras Festival Goa | Canva

वामन जयंती

दरवर्षी गणेश चतुर्थी उत्सवात वामन जयंतीदिनी हा उत्सव मोठ्या उत्साहात व परंपरेप्रमाणे साजरा होतो.

Baras Utsav|Baras Festival Goa | Canva

पाना फुलांचा वापर

बांबूच्या काठ्यांनी बांधून तयार करण्यात येणाऱ्या बारसला पावसाळ्यात जंगलात फुलणाऱ्या विविध पाना फुलांनी सजविले जाते.

Baras Utsav|Baras Festival Goa | Canva

अनेक जिन्नस

बारसला ठेवण्यात येणाऱ्या एका छिद्रातून बारा काश्ये उकडा भात, बारा दवले कुळीताची शिजविलेली पिठी, अळू, पाच पाल्यांची भाजी, वडे असे जिन्नस ठेवतात.

Baras Utsav|Baras Festival Goa | yugaantargoa

वळ्याचा दिवा

बारसीत नारळाच्या वळ्याचा दिवा लावला जातो.

Baras Utsav|Baras Festival Goa | yugaantargoa

पिठाच्या वस्तू

बारसीत ठेवण्यासाठी पिठापासून जुला बांधलेले दोन बैल (बैलजोडी) व नांगरणीचे जू, एक शेतकरी, एक मगर व कासव बनविले जाते.

Baras Utsav|Baras Festival Goa | yugaantargoa

मिरवणूक

सार्वजनिक सांगणे झाल्यानंतर बारस यजमानाच्या डोक्यावर दिली जाते. त्यानंतर हर्रो... हर्रो... च्या गजरात या बारसीची मिरवणूक गावातून निघते.

Baras Utsav|Baras Festival Goa | yugaantargoa

पारंपरिक वाट

ही मिरवणूक वाजत गाजत शेतातील पारंपरिक वाटेतून नदीवर जाते. नदीच्या पाण्यात ही बारस विधीवतपणे सोडली जाते. त्यानंतर गावातील ग्रामस्थांना भोजन दिले जाते.

Baras Utsav|Baras Festival Goa | yugaantargoa
Patri Ganapati
'श्रीगणेश पूजनाची' अनोखी पद्धत! खऱ्या अर्थाने घडते 'निसर्गपूजा'