Chimbel Unity Mall Dainik Gomantak
गोवा

Chimbel Unity Mall: युनिटी मॉलची प्रक्रिया रद्द, तरी चिंबल पठारावर खोदकाम सुरूच? पाणलोट क्षेत्राच्या सुरक्षेवर ग्रामस्थ चिंतित, ग्रामपंचायतीकडून पाहणी

Goa land issue: गोवा पंचायत राज कायदा, १९९४ मधील कलम ८२ अंतर्गत बजावलेल्या नोटिशीनंतर चिंबल ग्रामपंचायतीने सर्व्हे क्र. ४०/१ मधील जागेची पाहणी केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: चिंबल पठारावरील प्रस्तावित युनिटी मॉलची प्रक्रिया रद्द झाल्यानंतरही जागेवरील खोदकाम, अवजड यंत्रसामग्री व इतर साहित्य कायम असल्याने नैसर्गिक पाणलोट क्षेत्राला व्यत्यय येत असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली. गोवा पंचायत राज कायदा, १९९४ मधील कलम ८२ अंतर्गत बजावलेल्या नोटिशीनंतर चिंबल ग्रामपंचायतीने सर्व्हे क्र. ४०/१ मधील जागेची पाहणी केली.

या पाहणीवेळी पंचायत प्रतिनिधी, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी, जैवविविधता व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्राम विकास समितीचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

पाहणीत बांधकामासाठी वापरण्यात येणारी अवजड यंत्रसामग्री जागेवरच असल्याचे आढळले. तसेच पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह विस्कळीत झाला असून, सुमारे २.६ मीटर खोलीपर्यंत उत्खनन करण्यात आल्याचे दिसून आले.

पुढील कृतीसाठी लवकरच बैठक

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या सहा महिन्यांपासून जागा मोठ्या प्रमाणावर खणलेल्या अवस्थेत असून ती पूर्ववत करण्यात आलेली नाही. पुढील कृती ठरविण्यास ग्रामस्थ लवकरच बैठक घेणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT