Panaji  Dainik
गोवा

Panaji News : चिंबल येथे सरकारी जमिनीची विक्री; बेकायदेशीरपणे अतिक्रमणाचा प्रकार

Panaji News : ५० हजार चौरस मीटर जागा; ‘आरजी’ने केला पोलखोल

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, प्रोव्‍होदोरिया, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गोवा सरकारच्या मालकीच्या एकूण ५०,००० चौरस मीटर सरकारी जमिनीवर चिंबल येथील परप्रांतीयांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले आहे, असा आरोप रिव्होल्‍युशनरी गोवन्स पक्षाने केला आहे.

तर चिंबल-इंदिरानगर झोपडपट्टीतील इतर स्थलांतरितांच्या नावावर विक्री कराराच्या बेकायदेशीर हस्तांतरणाच्या प्रकरणाची सरकारने चौकशी करावी, अशी मागणीही करण्‍यात आली आहे.

सोमवारी (ता.११) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रिव्‍होल्‍युशनरी गोवन्स  पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी चिंबल पंचायतीअंतर्गत इंदिरानगर झोपडपट्टीतील परप्रांतीयांनी सरकारी जमिनीवर केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याबद्दल राज्य सरकार आणि स्थानिक पंचायतीला दोषी धरले आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून बेकायदेशीर कृत्यांचे समर्थन करणाऱ्यांवर कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करावी. असे प्रकार परत घडू नयेत यासाठी सरकारने कडक उपाययोजना करावी, अशी मागणी मनोज परब यांनी केली. यावेळी राज्यातील अन्य भागांत झालेल्या अतिक्रमणांकडेही त्यांनी लक्ष वेधले.

काय म्‍हणाले परब?

चिंबल येथील सर्व्हे क्रमांक ४२ मधील ५० हजार चौरस मीटर जागेत १९८९ पासून ४ हजार बेकायदा घरे बांधण्यात आली आहेत. या बेकायदेशीर बांधकामांची विक्री करून वीजबिल व पाणी बिलाचे हस्तांतरण बेकायदेशीरपणे केले जाते.

इंदिरानगर बस्ती येथील रहिवासी असलेल्या इतर स्थलांतरितांची नावे या घरांच्या पाण्याच्या आणि वीज बिले खरेदीदाराच्या नावे चढवली जातात.

चिंबलमधील या अवैध परप्रांतीयांना संरक्षण देण्यात महसूल मंत्री, पंचायत मंत्री, स्थानिक पंचायत व इतर अनेक अधिकारी गुंतले आहेत. गरज पडल्यास आम्ही हा मुद्दा घेऊन न्यायालयात याचिकाही दाखल करण्याची आमच्या पक्षाची तयारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' भाजपचेच प्यादे? चोडणकरांचा उपरोधिक टोला; 'आप'-भाजपमध्ये पंजाब-गोवा 'एक्सचेंज ऑफर' असल्याचा दावा

खरी कुजबुज: विकास नेमका कोणासाठी?

Swamala Campaign: 150 वर्षांचा आयुर्वेदिक वारसा अन् परेश रावल यांची साथ! 'स्वमाला'साठी धूतपापेश्वरची नवी मल्टिमीडिया मोहीम

Sanju Samson Record: 7 चौकार अन् 4 षटकार! 20 चेंडूंत वादळी अर्धशतक ठोकत संजूची हिटमॅनच्या क्लबमध्ये एन्ट्री; टीकाकारांचीही केली बोलती बंद

SCROLL FOR NEXT