Chimbel Gram Sabha |Kadamba Plateau Mall Dainik Gomantak
गोवा

Kadamba Plateau: कदंब पठारावरील ‘युनिटी मॉल’ला विरोध; चिंबल ग्रामसभेत ठराव मंजूर

Chimbel Panchayat Gram Sabha: पाणथळ घोषित केलेल्या तळ्याच्या शेजारी हा मॉल आल्यास तळ्याला क्षती पोहोचणार असून सरकारने हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली

गोमन्तक डिजिटल टीम

तिसवाडी: कदंब पठारावरील प्रस्तावित युनिटी मॉल बांधण्यास चिंबल ग्रामसभेत विरोध करण्यास आला. पाणथळ म्हणून घोषित केलेल्या तळ्याच्या शेजारी हा मॉल आल्यास तळ्याला क्षती पोहोचणार असून सरकारने हा प्रकल्प त्वरित रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. या प्रकल्पा विरोधात ठराव मांडून एकमताने संमत करण्यात आला.

प्रथम आयटी पार्क आणण्याच्या दृष्टिकोनातून ही जमीन काबीज करण्याचा नियोजन केले गेले होते, परंतु आम्ही याला विरोध केल्यानंतर प्रकल्प रद्द झाला. आता मॉल आणून सभोवतीची जमीन हडपण्याचा कट आहे. सुमारे ४.५० लाख चौ. मी. जमिनीपैकी १.८० लाख चौ. मी. जमीन पाणथळाच्या अखत्यारित आणण्यास यश मिळाले. जर हा मॉल आला तर पर्यावरण नष्ट होईल व याचे गंभीर परिणाम जलस्रोतांवर होणार आहेत, असे मत ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केले.

या विषय चर्चेस आल्यानंतर सरपंच संदेश शिरोडकर यांनी या मॉल संदर्भात मंजुरीसाठी कोणताही दस्तावेज न आल्याची माहिती दिली. प्रकल्पाच्या विरोधात पंचायतीच्या जैवविविधता व्यवस्थापन समितीचे गोविंद शिरोडकर यांनी हा विषय मांडून पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्यावर हल्लाबोल केला. आयटी पार्कच्या वेळी देखील हेच मंत्री होते. आम्ही सांताक्रूझचे आमदार रुडाल्फ फर्नांडिस यांना सूचना दिली असून आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे, असे शिरोडकर म्हणाले.

स्मशानभूमीवरून ग्रामस्थ आक्रमक

ग्रामसभेत स्मशानभूमीचा विषय पुन्हा एकदा चर्चेस आल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले. गेल्या अनेक वर्षांपासून हा विषय प्रलंबित असून स्मशानभूमीत जाणारी वाट अडवली गेली आहे. संबंधित बिल्डरला दिलेला परवाना त्वरित रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शिरोडकर यांनी या तक्रारीची दखल घेऊन या भागाचे निरीक्षण करणार असल्याचे उत्तर दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"रिफ्रेश आणि रिचार्ज!" फायनलपूर्वी RCBच्या पोरींची गोव्यात धम्माल! स्मृती अन् सायलीचा कूल अंदाज तर श्रेयंका-अंरुधतीचा स्टायलिश लूक चर्चेत

भारताला टार्गेट करुन अमेरिकेची मोठी कारवाई! 'ऑपरेशन मेल्टडाउन' अंतर्गत 200 हून अधिक फार्मसी वेबसाइट्स बंद; काय नेमकं प्रकरण?

Dhurandhar 2 ने रिलीजपूर्वी तोडले सर्व रेकॉर्ड! मिळवले बक्कळ पैसे; एवढ्या किमतीत विकले OTT Rights

GCA: 'कोट्यवधींच्या जीसीए घोटाळ्याची चौकशी 6 महिन्यांत करा'! न्यायालयाने दिले निर्देश; निविदा न काढताच 6.5 कोटींच्या वर्क ऑर्डर्स

IND vs PAK: "भारताविरुद्धचा सामना आम्ही खेळणार नाही!" हाय-होल्टेज मुकाबल्यावर पाक PM शाहबाज शरीफ यांचं मोठं वक्तव्य; पीसीबीला बसणार कोटींचा फटका?

SCROLL FOR NEXT