children park bicholim Dainik Gomantak
गोवा

डिचोलीतील ‘चिल्ड्रन पार्क’ ठरतेय वरदान

साधन-सुविधा उपलब्ध: उन्हाळी सुट्टीमुळे लहान मुलांचा दररोज गजबजाट

दैनिक गोमन्तक

डिचोली: चार महिन्यांपूर्वी लोकार्पण करण्यात आलेले डिचोली शहरातील गृहनिर्माण वसाहतीतील ‘चिल्ड्रन पार्क’ (बालोद्यान) अनेकांना आकर्षित करीत आहे. लहान मुलांसाठी वरदान ठरलेल्या या बालोद्यानात दिवसेंदिवस किलबिल आणि गजबजाट जाणवत आहे. सध्या शाळांना सुटी पडल्याने त्यात आता आणखी भर पडली आहे.

राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने सुमारे 1.20 कोटी रुपये खर्चून हे ‘चिल्ड्रन पार्क’ उभारण्यात आले आहे. गेल्या 24 डिसेंबर रोजी या बालोद्यानाचे लोकार्पण करण्यात आले आहे. या बालोद्यानात झोपाळे, घसरगुंडी आदी मुलांना खेळण्यासाठी आवश्यक असलेली साधने उपलब्ध आहेत.

या बालोद्यानात रोज सायंकाळी लहान मुलांची वर्दळ दिसून येते. गृहनिर्माण वसाहत तसेच आजुबाजूच्या परिसरातील लहान मुले आपापल्या पालकांसमवेत खेळण्या-बागडण्यासाठी या बालोद्यानात येतात. रोज रात्री बालोद्यान बंद करेपर्यंत लहान मुलांचा बालोद्यानात किलबिल आणि गजबजाट दिसून येत असतो. मुलांसह येणारे पालक आणि अन्य नागरिकही या बालोद्यानात येऊन मोकळी हवा घेतानाच बालोद्यानातील वॉकिंग ट्रॅकवर पाय मोकळे करून घेतात.

बॅडमिंटन आणि योगा: लहान मुलांसह तरुणाई आदी नागरिकांना हे ‘चिल्ड्रन पार्क’ आकर्षित करीत आहे. या ‘चिल्ड्रन पार्क’ मध्ये बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात आला आहे. त्यामुळे या बालोद्यानात तरुणाई आदी क्रीडाप्रेमी बॅडमिंटनचा सराव करताना दिसून येतात. खास करून काही महिलाही योगाची प्रात्यक्षिके करताना दिसून येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT