New Born Baby 
गोवा

हृदयविकाराच्या दुर्मिळ आजाराने जन्माला आले बाळ, 300 मिनिटांत बंगळुरुला एअरलिफ्ट करुन दिला दुसरा जन्म

गोमन्तक डिजिटल टीम

जन्म होताच एका बाळाला श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्याने ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागली होती. त्यावेळी हे बालक हृदयविकाराच्या दुर्मिळ आजाराने जन्माला आल्याचे निदान झाले होते.

मात्र, गोव्यातील ज्या रुग्णालयात या समस्येचे निदान झाले, तिथे त्या बाळाच्या शस्त्रक्रियेसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या. परिणामी तत्काळ वैद्यकीय हालचालींनंतर बाळाला बंगळुरूला एअरलिफ्ट करणे हा एकमेव पर्याय होता.

त्यानुसार नवजात बाळाला 300 मिनिटांच्या आत मणिपाल हॉस्पिटल ओल्ड एअरपोर्ट रोड, बंगळुरू येथे आपत्कालीन हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी सुरक्षितपणे हलविण्यात आले. २० मे २०२४ रोजी जन्मानंतर बाळाला विसंगत पल्मोनरी वेनस कनेक्शन (टीएपीव्हीसी) या अत्यंत दुर्मिळ व धोकायदायक जन्मजात हृदयविकाराच्या स्थितीचे निदान झाले.

ज्यासाठी त्वरित वैद्यकीय सुविधा आवश्यक होती. यावर वेळीच उपचार न केल्यास बाळाच्या शरीरावर घातक परिणाम होण्याची शक्यता होती. त्यानुसार २१ मे २०२४ रोजी सायंकाळी उशिरा बाळास गोवा ते बंगळुरूपर्यंत एअरलिफ्ट केले. तेथे त्या बाळाचा जीव वाचविणारी यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली.

जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

बंगळुरू येथे कार्डिओथोरॅसिक व्हॅस्कुलर सर्जरी हॉर्ट अँड लंग ट्रान्स्प्लांट सर्जरीचे प्रमुख व सल्लागार डॉ. देवानंद एन.एस. यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकाने त्वरित कृती करून पाच तासांची जटिल शस्त्रक्रिया पार पाडली.

डॉ. देवानंद एन.एस. यांनी नमूद केले की, एका दिवसाच्या बाळाच्या शस्त्रक्रियेची जोखीम असूनही शस्त्रक्रिया चांगली झाली. तिसऱ्या दिवशी व्हेन्टिलेटर काढून टाकण्यात आले व बाळ आयसीयूमध्ये २५ दिवस राहिल्यानंतर १४ जून २०२४ रोजी त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

तांत्रिक प्रगतीमुळे उपचार

बाळ आता जवळजवळ एक महिन्याचा आहे. त्याची प्रकृती सुधारली असून त्याला गोव्यात आणले आहे. लवकर निदान व वेळेत उपचार अशा प्रकारच्या बऱ्याच मुलांना वाचवण्यास मदत करतात. आज देशात विविध प्रकारचे कौशल्य, तांत्रिक प्रगतीमुळे बहुतेक जन्मदोषांवर ताबडतोब उपचार करणे शक्य आहे, असे डॉ. देवानंद यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

Quelossim: ही तर नौटंकी! केळशीची बदनामी केल्याचा व्हेंझी यांच्‍यावर सरपंचांचा आरोप

Sunburn Festival 2024: धार्मिक स्थळी 'असले' कार्यक्रम नकोच! 'सनबर्न' साठीच्या सभेनंतर ग्रामस्थ ठरवणार दिशा

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

SCROLL FOR NEXT