Paul Fonseka Arrest Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: चॉकलेट देऊन अल्‍पवयीन मुलांवर लैंगिक अत्‍याचार करणारा 'पॉल अंकल' जेरबंद, गुंगीचे औषध देऊन करायचा शोषण

Paul Fonseka Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवून अल्‍पवयीन मुलांवर लैंगिक अत्‍याचार करणारा पॉल फोन्सेका (५९, रा. थिवी) याला पोलिसांनी जेरबंद केले आहे.

Sameer Panditrao

Paul Fonseka Thivim Crime News

म्हापसा: चॉकलेटचे आमिष दाखवून अल्‍पवयीन मुलांवर लैंगिक अत्‍याचार करणारा पॉल फोन्सेका (५९, रा. थिवी) याला पोलिसांनी जेरबंद केले आहे. मुलांना आपल्‍या वासनेची शिकार बनविण्‍यापूर्वी त्‍यांना तो पोर्नोग्राफी व्हिडिओ दाखवायचा. ‘पॉल अंकल’ म्‍हणून मुले त्‍याला हाक मारायची. दरम्‍यान, या प्रकारामुळे गोव्‍यात काही वर्षांपूर्वी गाजलेल्‍या फ्रेडी पिट्‌स प्रकरणाच्‍या आठवणी ताज्‍या झाल्‍या.

मिळालेल्‍या माहितीनुसार, एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी पॉल याला अटक केल्‍यानंतर हळूहळू त्‍याचे कारनामे बाहेर येऊ लागले आहेत. याप्रकरणी पीडित मुलाची आई ही फिर्यादी आहे.

किळसवाणा प्रकार केल्यानंतर संशयिताने पीडित मुलाला घटनेची कुठेही वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली होती. सध्‍या तो मुलगा प्रचंड दहशतीखाली असल्याचे समजते. पॉलने हा किळसवाणा प्रकार आपल्या थिवी येथील घरात केला.

त्यानंतर त्याने मुलाला मध्यरात्री बाहेर फिरायला जाऊ असे सांगून दुचाकीवरून थिवी रेल्वे स्थानकावर आणले. तेथे कोकण रेल्वे पोलिसांनी उत्तररात्री संशयित पॉल याला पाहिले. त्याच्यासोबत अल्‍पवयीन मुलगा असल्याने पोलिसांनी त्याला हटकले. मात्र त्याच्याकडे समर्पक उत्तर नसल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. तसेच एनजीओच्या मदतीने पीडित मुलाला बोलते करण्याचा प्रयत्न केला.

दहशतीखाली असलेल्या मुलाने आपल्यावरील आपबीती एनजीओ व पोलिसांसमोर कथन केली. सामाजिक कार्यकर्त्या आवदा व्‍हिएगस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या घटनेची माहिती दिली.दरम्‍यान, पोलिसांनी संशयित पॉल याच्‍याविरोधात कलम १३७ (२), ११५ (२), ३५१ (२), गोवा बालकायदा कलम ८ (२) व पॉक्सो कायदा ८ व १२ अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली आहे. कोकण रेल्वे पोलिसांकडून नंतर हे प्रकरण कोलवाळ पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

प्रसंगी मुलांना मारबडव करून करायचा कुकर्म

पॉल हा आपल्या दुचाकीवरून लहान मुलांना फिरायला घेऊन जायचा व त्‍यांच्‍याशी मैत्री करून जवळीक निर्माण करायचा. संशयिताने पीडित मुलाच्‍या लहान भावावर देखील अत्याचार केल्याचे समजते. एखादा मुलगा सहकार्य करत नसल्‍यास किंवा ऐकत नसल्यास संशयित त्‍याला मारबडव करायचा. या प्रकारामुळे मुले संशयिताच्या दहशतीखाली होती. काही लहान मुले पॉर्नोग्राफी व्हिडिओ पाहताना पालकांना सापडली.

फ्रेडी पिट्‌सचा नवा ‘अवतार’

लहान मुलांवर लैंगिक अत्‍याचार करणाऱ्या फ्रेडी पिट्‌स याचे प्रकरण काही वर्षांपूर्वी गोव्‍यात गाजले होते. या प्रकरणाचा तपास केल्‍यानंतर लहान मुलांचा वेश्‍‍याव्‍यवसायासाठी वापर करणारे एक आंतरराष्‍ट्रीय रॅकेट उघडकीस आले होते.

चॉकलेटचे आमिष अन्‌ गुंगीचे औषध

‘पॉल अंकल’ मुलांना आपल्‍या घरी फूस लावून न्यायचा. त्‍यांना पोर्नोग्राफी व्हिडिओ दाखवायचा. तसेच खायला चॉकलेट किंवा इतर खाद्यपदार्थांमधून गुंगीचे औषध देऊन आपली वासना भागवायचा. अनेक मुले त्‍याची शिकार बनली असावीत असा अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT