Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 3 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, पत्नीला जीवे मारण्याची धमकी; अमेरिकेतील व्यक्तीवर गुन्हा नोंद

Margao Crime: तक्रारदार महिला मडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत असून आपल्‍या पतीने आपलाही यापूर्वी शारिरीक तसाच मानसिक छळ केला होता असे तक्रारीत म्‍हटले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: सध्‍या अमेरिकेत वास्‍तव करून असलेल्‍या आदित्य बकाया (वय ४१) याने आपल्‍याच तीन वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्‍याची तक्रार त्‍या मुलीच्‍या आईने मडगाव पाेलिस स्‍थानकात केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयितावर गुन्‍हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

मडगाव पोलिसांनी दिलेल्‍या माहितीप्रमाणे, त्‍या पिडीत मुलीच्‍या आईने दिलेल्‍या तक्रारीनुसार मडगाव पोलिसांनी संशयिताच्‍या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या ८५ (स्‍वत:च्‍याच स्‍वकीयाचा छळ करणे), ३५१ (२) (धमकी देणे), बाल संरक्षण कायदा कलम ४, ८, १२ व गोवा बाल कायदा कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

पोलिस निरीक्षक सूरज सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनुष्का परब पुढील तपास करीत आहेत. तक्रारदार महिला मडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत असून आपल्‍या पतीने आपलाही यापूर्वी शारिरीक तसाच मानसिक छळ केला होता असे तक्रारीत म्‍हटले आहे. ऑगस्ट २०१४ ते चालू वर्षी १० ऑक्टोबरपर्यंत हा जाच सुरू होता. आपल्‍या पतीने आपल्‍याला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

तसेच आपल्या मुलीचाही त्याने लैंगिक छळ सुरू केला होता, असे तिने आपल्‍या तक्रारीत म्‍हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी मडगाव पोलिस ठाण्यात संपर्क साधला असता, आम्ही तक्रार नोंद करून संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असून सध्या तपास प्राथमिक स्थितीत असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT