Goa Bachao Abhiyan | Goa Foundation Dainik Gomantak
गोवा

Goa News: मुख्य सचिव, मुख्य नगर नियोजक अडचणीत; 'गोवा बचाव'ची कोर्टात याचिका, मागणी काय वाचा

Goa Bachao Abhiyan: मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल आणि मुख्य नगर नियोजक राजेश नाईक यांनी आचारसंहितेचे उल्लंघन करून नगरनियोजन खाते कायद्याच्या १७(२) दुरुस्तीचा वापर करून मालमत्तेवरील बेकायदा बांधकाम कायदेशीर केले आहे. यासंदर्भात आम्ही गोवा फाउंडेशन सोबत उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केल्याचे गोवा बचाव अभियानाच्या सचिव सबिना मार्टिन्स यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Bachao Foundation Demands Suspension Of Chief Secretary, Chief Town Planner

पणजी: मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल आणि मुख्य नगर नियोजक राजेश नाईक यांनी आचारसंहितेचे उल्लंघन करून नगरनियोजन खाते कायद्याच्या १७(२) दुरुस्तीचा वापर करून मालमत्तेवरील बेकायदा बांधकाम कायदेशीर केले आहे.

यासंदर्भात आम्ही गोवा फाउंडेशन सोबत उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केल्याचे गोवा बचाव अभियानाच्या सचिव सबिना मार्टिन्स यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी सीबीआयद्वारे चौकशी करून दोघांनाही निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी पत्रकार परिषदेत पर्यावरण प्रेमी फेस्टेरिया पिंटोदेखील उपस्थित होत्या.

सबिना मार्टिन्स यांनी सांगितले की, या विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी १९ सप्टेंबर रोजी आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती, परंतु आजवर त्यांनी आम्हाला वेळ दिली नाही. राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी खासगी हितासाठी राज्य यंत्रणांचा उघडपणे गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT