CM pramod sawant Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्र्यांनी केले गोमातेचे पूजन! राज्यातील दूध उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन

दूध उत्पादकांनीही सहकार्य करावे; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Kavya Powar

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बलिप्रतिपदानिमित्त कुडणे येथील गोमांचल डेअरी फार्मला भेट देऊन गोमातेची पूजा केली. दरवर्षी मुख्यमंत्री पाडव्यानिमित्त गोशाळेला भेट देऊन गोमातेची पूजा करतात. यावर्षीही त्यांनी गोमांचल डेअरी फार्मला खास भेट दिली.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यात दरदिवशी चाडेचार लाख लीटर दूध लागते. पण गोव्याला तील लाख लीटर दूध बाहेरून घ्यावे लागते. यासाठी गोसंवर्धन व दूध उत्पादन वाढवणे आवश्यक आहे. देशी गायींबरोबरच इतरही जातीच्या गायींचे संवर्धन करणे गरजेचे आहे. गोव्यात भटक्या गुरांचा मोठा प्रश्न आहे. त्यांना सध्या विविध गोशाळांमध्ये दाखल करण्यात येत आहे.

त्यामुळे ही समस्या संपून या गुरांपासून बनविण्यात येणाऱ्या गोमय उत्पादनांचा लोकांना व गोशाळांना फायदा होणार आहे. गोमूत्र व शेण यापासून उत्पादने बनविण्यासाठी सरकारकडून लवकरच प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्यासोबत वल्लभ साळकर, सुभाष मळीक, संतोष मळीक, शिवानंद बाकरे व इतरांची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोमांचल डेअरीत दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांचा गौरव करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

SCROLL FOR NEXT