Goa Forward Dainik Gomantak
गोवा

Goa Forward: मुख्यमंत्री साहेब मोफत तीन सिंलिंडर कुठे आहेत? गोवा फॉरवर्डचा सवाल

निवडणुकीत केवळ मतं मिळवण्यासाठी सरकारने ही खोटी आश्वासनं दिली

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Forward गोव्यातील विधानसभा निवडणुकीआधी भाजपने तीन मोफत सिंलिंडर देण्याचं आश्वासन मतदारांना दिलं होतं. सत्तेत आल्यानंतर जवळपास 8 महिन्यांनी वर्षाला तीन सिलिंडर मोफत देण्याची घोषणा गोवा सरकारने केली होती.

मात्र अद्याप ही योजना अंमलात आली नसून या "तीन मोफत गॅस सिलिंडर" योजनेबाबत भाजपने गोव्यातील प्रत्येक घरातील महिलांना मूर्ख बनवले आहे, असा आरोप गोवा फॉरवर्ड पार्टी तर्फे करण्यात आलाय.

या संदर्भात आज गोवा फॉरवर्ड उपाध्यक्ष अॅड. अश्मा आणि निमेसिया फालेरो यांनी पत्रकार परिषद घेत भाजप सरकारवर आरोप केलाय.

डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने मोफत सिंलिंडरची 'ती' फाईल प्रलंबित ठेवली असून गोमंतकीय महिलांच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसली आहेत.

निवडणुकीत केवळ मतं मिळवण्यासाठी सरकारने ही खोटी आश्वासनं दिली होती हे त्यांनी सिद्ध करून दाखवले.

या योजनेची फाईल मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये जुनमध्येच पोहोचली असून त्यावर सही मात्र नोव्हेंबरमध्ये करण्यात आली. थोडक्यात भाजप सरकारला या योजनेची अंमलबजावणी करायची नसून केवळ खोटी आश्वासने देऊन जनतेच्या तोंडाला पाने पुसायची आहेत असा घणाघात अॅड. अश्मा आणि निमेसिया फालेरो यांनी पत्रकार परिषद केला.

"रेशनकार्ड धारक आणि ज्यांचं वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी असेल अशा सर्वांना 3 मोफत सिलिंडर मिळतील. तसेच जर ही योजना कोणत्याही निकषांविना सर्व गोमंतकीयांसाठी राबवायची झाल्यास त्यासाठी सरकारी तिजोरीवर तब्बल 132 कोटींचा अतिरिक्त भार पडणार" असल्याचे ग्रामीण विकास मंत्री गोविंद गावडे यांनी असे जाहीर केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT