Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्री सावंत यांचे गोमंतकीयांना लस आणि बुस्टर डोस घेण्याचे आवाहन

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सध्या गंभीर अवस्थेत असलेल्या 16 कोरोना बाधितांपैकी 13 जणांचे लसीकरण झालेले नाही.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. परिणामी सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 व्यवस्थापन बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील लोकांना लस घेण्याचे आवाहन केले आहे. याच बरोबर त्यांनी 60 वर्षावरील लोकांना बुस्टर डोससाठी पुढे येण्याचे देखील आवाहन केले आहे. (Pramod Sawant on Goa Vaccine News Update)

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सध्या गंभीर अवस्थेत असलेल्या 16 कोरोना बाधितांपैकी 13 जणांचे लसीकरण झालेले नाही. मागील आठ दिवसात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 70 टक्के रुग्णांचे लसीकरण झालेले नव्हते. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, मृत्यूमुखी पडलेल्या 26 प्रौढांपैकी 18 लोकांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतला नव्हता.

राज्य लसीकरण अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर म्हणाले, “लस (Vaccine) आपला कोरोना पासून बचाव करते असे फक्त आम्हीच म्हणत नाही आहोत तर जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) देखील हेच म्हणणे आहे. लस घेतल्यामुळे कोरोनाची लागण होत नाही असे नसले तरी शरीर कोरोना विरुद्ध लढण्यासाठी सक्षम होते. परिणामी मृत्यूचा धोका देखील कमी होतो.

सरकारने राज्यातील आरोग्य कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोनाच्या (Coronavirus) बुस्टर डोसची व्यवस्था केली आहे. राज्य सरकारने 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसिकरणाला सुरुवात झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

Asian Games 2026: ब्लॉकबस्टर फायनल होणार! श्रीलंकेला 124 धावांनी धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश, आता जेतेपदासाठी पाकिस्तानशी होणार 'कांटे की टक्कर'

Success Motivation: 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..!'; अपयश आलं तरी थांबू नका, प्रयत्नांची साथच यशाचा मार्ग दाखवते

Mental Health Rehabilitation: मानसिक आजारावर उपचार झाले, पण पुढे काय?; रुग्णाच्या पुनर्वसनासोबत कुटुंबालाही आधाराची गरज

SCROLL FOR NEXT