CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Crime Case: ओळखीच्या व्यक्तींकडूनच घात? गोव्यातील वाढत्या बलात्कारांच्या घटनांवर मुख्यमंत्र्यांचं 'हे' उत्तर

दैनिक गोमन्तक

पणजी: 'गोव्यातील 90 टक्के बलात्काराच्या घटना ओळखीच्या व्यक्तींकडूनच झाल्या आहेत' असे विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी केले. दरम्यान, त्यांनी पुढे नागरिकांना “कोणावरही विनाकारण विश्वास ठेवू नका” असे आवाहन केले.

(Chief Minister Pramod Sawant's statement that most rapes are 'by strangers' in goa)

“90 टक्क्यांहून अधिक बलात्काराच्या घटनांमध्ये आरोपी हे पीडितेच्या ओळखीचे असतात. कोणावरही विनाकारण विश्वास ठेवू नका,” अल्तिन्हो येथील जीआरपी ब्लॉक येथे एका पोलिस कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले. गोव्यातील गुन्हे शोधण्याचे प्रमाण देशात सर्वाधिक असतानाही गुन्हेगारीच्या घटना कमी करण्यासाठी सावंत यांनी जनतेचे सहकार्य मागितले.

“गोवा हे छोटे राज्य आहे आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी लोकांचे सहकार्य खूप कौतुकास्पद आहे. आम्ही तुमच्या शेजार्‍यांना जाणून घ्या यासारख्या अनेक योजना आणल्या आहेत तसेच नागरिकांनी संशयास्पद हालचाली पोलिसांना कळवल्या पाहिजेत यासाठी इतर प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केला आहे,” असे सावंत म्हणाले. हे एकट्या पोलिसांचे कर्तव्य नसुन, यासाठी लोकांनी सहकार्य केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

2019 सालापासून राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे आणि तपासात वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले “गेल्या दोन वर्षांत, कोविड महामारीमुळे, अनेक लोकांचे स्थलांतर झाले आणि ते राज्यातील आर्थिक घडामोडीमुळे परतत आहेत. गोव्यातील गुन्ह्यांमध्ये अनेक बाहेरील लोक सामील आहेत, ”असे ते म्हणाले.

राज्यातील अंमली पदार्थांशी संबंधित कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांना दिलेल्या सूचनांचा पुनरुच्चार करताना मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी किशोरवयीन आणि तरुणांना अंमलीपदार्थांच्या व्यवसायापासून दूर राहण्याचे आवाहन केले.

दरम्यान, राज्यातील फार्मा आणि इतर कंपन्या कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करत असतानाही त्या सीएसआर उपक्रमांवर एक टक्काही खर्च करत नसल्याची खंत सावंत यांनी व्यक्त केली.

त्यांनी अशा कंपन्यांना राज्य सरकारच्या CSR उपक्रमांतर्गत CSR उपक्रम हाती घेण्यास सांगितले. ते म्हणाले की, कंपन्यांनी त्यांच्या निव्वळ नफ्यातील किमान 2 टक्के रक्कम सीएसआर म्हणून मागील तीन वर्षांमध्ये खर्च करणे आवश्यक आहे.

सीएसआर उपक्रमांतर्गत 100 दुचाकी गोवा पोलिसांना वितरित करण्यात आल्या, ज्यांना गोवा पोलिसांचा लोगो आणि जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम बसविण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

Taliban: तेलाच्या खेळात तालिबान आजमावतोय हात; ‘या’ दोन देशांसोबत बनवली खास योजना!

Mumbai Goa Highway: ठाकरे गटातील नेत्याच्या हत्येचा प्रयत्न, आमदाराच्या मुलावर आरोप; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

SCROLL FOR NEXT