CM sawant met PM modi on various issues
CM sawant met PM modi on various issues 
गोवा

दिल्लीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

गोमन्तक वृत्तसेवा

पणजी: राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज दिल्लीत पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. गोव्याचा कोळसा खाण प्रश्न तसेच अन्य विषयांबाबत पंतप्रधानांशी चर्चा केल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे. या विषयी केंद्रीय खनिज मंत्री प्रल्हाद जोशी यांचीही सावंत यांनी भेट घेतली.

सात महिन्यांच्या कालावधीनंतर मुख्यमंत्री दिल्लीत दाखल झाले. पंतप्रधानांनी त्यांना आज भेटीसाठी वेळ दिली होती. राज्यात खनिजांच व्यवसाय बंदच आहेत. गोवा सरकार खनिज विकास महामंडळ स्थापन करण्याच्या तयारीत आहे, अशी चर्चा होती. मात्र, सरकारने महामंडळही स्थापन केले नाही. न्यायालयीन लढाईतूनही खाणप्रश्नी अजून काही तोडगा निघालेला नाही. याआधी अनेकवेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरही सरकारने खाणप्रश्नी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी आता तोच विषय परत लावून धरला आहे.

महसूल कमी झाल्यानंतरही केंद्राकडून कोणतेही आर्थिक पॅकेज जाहीर झालेले नाही. गोव्याची आर्थिक स्थिती सध्या खूप बिकट आहे. उत्पन्न वाढविण्याचे नवीन मार्गही गोवा सरकारकडे उपलब्ध नाहीत. मुख्यमंत्र्यांनी याविषयीही पंतप्रधानांशी चर्चा केली असावी, असे मानले जात आहे. राज्याची राजकीय स्थिती,  केंद्राच्या नवीन कृषी कायद्यांना विरोधकांकडून केला जाणारा विरोध, नवीन राज्यपालांची नियुक्ती अशा अनेक विषयांवर मुख्यमंत्री पंतप्रधानांशी बोलले असतील, अशी चर्चा आहे.

याबाबत मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे माहिती देताना आपण केंद्रीय खनिज मंत्री जोशी यांना भेटलो असल्याचे त्यांनी कळवले. आपण खाणप्रश्नी सविस्तर चर्चा केली. पुढील काही दिवसांमध्ये यावर  सकारात्मक तोडगा निघेल, अशी आम्हाला आशा असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Goa's News Wrap: ताळगाव निवडणूक निकाल, फोंड्यात खून; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT