CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 6 देशांतील तरुणांशी साधला संवाद

शिष्टमंडळाशी राजकारण, संस्कृती, अर्थव्यवस्था अशा विविध विषयांवर केली चर्चा

दैनिक गोमन्तक

केंद्रीय गृह विभागाने 'Gen Next Democracy Network' हा कार्यक्रम आयोजित केली आहे. या कार्यक्रमांतर्गत गोव्याच्या दौऱ्यावर 18 व्यक्तींचे शिष्टमंडळ आहे. यांच्यासोबत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 6 देशातून आलेल्या शिष्टमंडळाशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राजकारण, संस्कृती, अर्थव्यवस्था अशा विविध विषयांवर चर्चा केली. तसेच मुख्यमंत्र्यांनी आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत देशात सुरु असलेल्या कार्यक्रमांची ही माहिती उपस्थितांना दिली.

(Chief Minister Pramod Sawant interacted with the youth of 6 countries)

या चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी भारतीय अर्थव्यवस्था, तसेच शेजारील राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था अन् त्यांच्या स्थिती याबाबत चर्चा केली. या चर्चेत कोस्टारिका, दक्षिण कोरिया, रोमानिया, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, ग्रीस या देशांतील खासदार, महापौर, उद्योगपती, अभ्यासक, अर्थतज्ज्ञ आदींच्या युवा शिष्टमंडळाशी संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली.

शिष्टमंडळाचा भाग असलेल्या युवा नेत्यांमध्ये गोव्याची प्रतिमा चांगली असेल, कारण आपल्या राज्याची सध्य स्थिती, नवं - नव्या योजनांसाठीची आखणी, त्यांची रुपरेषा नेमकी कशी आहे. याबाबत शिष्टमंडळाशी संवाद साधला आहे. त्यामुळे आपापल्या देशात राज्याच्या पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर आझादी का अमृत महोत्सव (AKAM) उत्सव सुरु करण्यात आला आहे. याचा भाग म्हणून, हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. यात आतापर्यंत पेरू, उरुग्वे, पराग्वे, घाना या देशांसह जगभरातील अनेक देशातील तरुणांनी सहभाग नोंदवला आहे. तसेच बांगलादेश, नेपाळ, ब्रुनेई, नॉर्वे, झेक प्रजासत्ताक, मॉरिशस, युगांडा आणि थायलंड. या देशांच्या शिष्टमंडळांनी ही भेट दिली आहे. असं ही ते यावेळी म्हणाले.

दुपारनंतर गोव्याचे राजभवन डोना पॉला येथे आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचा भाग म्हणून 'Gen Next Democracy Network' या कार्यक्रमांतर्गत गोव्याच्या दौऱ्यावर असलेल्या 6 देशांतील 18 प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. यावळी राज्यापालांनी शिष्टमंडळाशी अनेक मुद्यावर चर्चा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT