CM Pramod Sawant | Smart City Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी... 'या' दिवसापर्यंत काम करणार पुर्ण

पावसाळ्यातील पुरासाठी पोर्तुगीजकालीन ड्रेनेज यंत्रणेला धरले जबाबदार

Akshay Nirmale

CM Pramod Sawant: गोव्याची राजधानी पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामांमुळे शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ उडाला आहे. गेल्या काही दिवसात या कामामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

या कामांवरून वारंवार टीका होऊ लागल्यानंतर शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या कामाची पाहणी करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी शनिवारी पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी केली.

या पाहणीनंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पोर्तुगीजकालीन जुनी ड्रेनेज यंत्रणा लहान आहे. त्यातील पाईप्स अनेक ठिकाणी फुटल्या आहेत. काही ठिकाणी ही यंत्रणा अडकून बसली आहे. त्यामुळे ड्रेनेज सिस्टिम ब्लॉक होते.

त्यातून दर पावसाळ्यात पणजीला पुराचा फटका बसतो. स्मार्ट सिटीच्या कामांतर्गत नवीन ड्रेनेज सिस्टिम बसवली जात आहे. त्यातून शहरातील पुराची समस्या दूर होणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत सर्व कामे मान्सूनला सुरवात होण्यापुर्वी पूर्ण केली जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT