पणजी : उत्तर गोवा जिल्हा पंचायतच्या अध्यक्षपदी सिद्धेश श्रीपाद नाईक यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. हे औचित्य साधत गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सिद्धेश यांनी यापुर्वी गोवा भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आहे. तसेच उत्तर गोवा जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून ही त्यांनी धुरा सांभाळलेली आहे. आणि आता उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदी ही त्यांची वर्णी लागल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. (Chief Minister Pramod Sawant congratulated Siddhesh Naik )
सिद्धेश नाईक अध्यक्षपदी झाल्यानंतर आपण जिल्हा पंचायतीच्या कामकाजात अधिकाधिक अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितले होते. तसेच सर्वांना सोबत घेऊन आपण काम करणार असल्याचं ही त्यांनी असल्याचे सांगितले होते. पहिली जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून सदस्यांकडून जिल्हा परिषदेला अधिकाधिक अधिकार देण्याची मागणी नेहमीच होत होती आणि ती आजही कायम आहे.
जिल्हा परिषदेला अधिकाधिक अधिकार द्यावेत, असे मला वाटते आणि ते मिळविण्यासाठी मी प्रयत्न करेन, असे ते म्हणाले होते. तसेच झेडपीने झेडपीची इमारत बांधण्याचा प्रस्ताव सरकारला दिला आहे आणि केंद्राकडून अधिक पैसे मिळावेत यासाठी मी केंद्रीय मंत्री वडील श्रीपाद नाईक यांची मदत घेणार असल्याचे सांगितले होते . राज्य शासनाने जिल्हा पंचायतीच्या कामासाठी रक्कम वाढवली असून त्यामुळे विकासकामांसाठी अधिक निधी उपलब्ध झाला असल्याचेही ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.