Chief Minister Pramod Sawant as Chairman of GSIDC Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्री प्रमोद सावंतांकडे आणखी एक जबाबदारी

2012 मध्ये सावंत यांना पक्षाने पहिल्यांदा जीएसआयडीसीची जबाबदारी दिली होती

दैनिक गोमन्तक

मुख्यमंत्र्यांनी काल मंत्रिमंडळाचे खाते वाटप केल्यानंतर फोंड्यात ‘थोडी खुशी थोडा गम’ असे वातावरण दिसले. फोंडा तालुक्यात एकंदरीत तीन मंत्री असल्यामुळे लोकांचे या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार यावर लक्ष लागून राहिले होते. या तीन मंत्र्यांत रवी नाईक यांच्यासारखा मुख्यमंत्रीपद, खासदारकीसारखी महत्त्वाची पदे भूषविलेले मंत्री असल्यामुळे लोकांची उत्कंठा अधिकच वाढली होती. दरम्यान, अशातच मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांची जीएसआयडीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यावेळी निवडून आलेल्या अनेकांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे हे पद तरी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र इतरांना डावलत सावंत यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे काही नेते नाराज असल्याची चर्चा आहे.

राजकारणात येण्यापूर्वी आयुर्वेदाचे अभ्यासक असलेल्या सावंत यांनी पर्रीकरांच्या आग्रहास्तव विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी 2007 मध्ये गोवा सरकारमधील नोकरी सोडली होती. सावंत हरले पण पर्रीकर यांनी त्यांना भाजपच्या युवा शाखा बीजेवायएम (भारतीय जनता युवा मोर्चा) मध्ये गोवा सरचिटणीस म्हणून सामावून घेतले. 2012 मध्ये सावंत यांनी साखळी या खाणपट्ट्यातून विधानसभा निवडणूक जिंकली. दोन वर्षांनंतर पर्रिकर केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला गेले. गोव्याचे नवे मुख्यमंत्री (CM) म्हणून लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) यांच्या नेतृत्वाखाली, सावंत यांना गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (GSIDC) चे प्रमुख बनवण्यात आले होते, जी राज्यातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी स्वायत्त संस्था आहे. आता पुन्हा त्यांची GSIDC च्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT