Chief Minister Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: 'सरकारी शाळा बंद पडू देणार नाही', मुख्यमंत्र्यांची ग्वाही; खासगी संस्थांवर फोडले खापर!

Government Primary Schools: सरकारी प्राथमिक शाळांत चार विद्यार्थी असले, तरी ती शाळा बंद पडू दिली जाणार नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

सरकारी प्राथमिक शाळांत चार विद्यार्थी असले, तरी ती शाळा बंद पडू दिली जाणार नाही. त्या शाळेत परत विद्यार्थी पटसंख्या वाढावी यासाठी प्रयत्न केले जातील असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. मंत्रालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सरकारी प्राथमिक शाळा बंद पडण्याचे खापर या शाळांच्या शेजारीच सुरू झालेल्या खासगी शाळांवर फोडले.

ते म्हणाले, विद्यार्थी नसल्याने काही सरकारी प्राथमिक शाळा बंद झाल्या आहेत. पण अवघे चार विद्यार्थी असलेल्या शाळा देखील काही भागांत असून अशा शाळा चालवण्यासाठी सरकारचे प्रयत्न निरंतर सुरू आहेत. मात्र शेजारीच खाजगी शाळा सुरू झाल्यामुळेही सरकारी शाळांवर परिणाम झाला आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात ७ सरकारी शाळा बंद पडल्या आहेत. यात डिचोली तालुक्यातील ४ तर फोंडा तालुक्यातील ३ शाळांचा समावेश आहे. दहा वर्षांपूर्वी, २०१४ साली राज्यात ८२२ सरकारी शाळा सुरू होत्या. गेल्या १० वर्षात १३५ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्याने सध्या ६८७ सरकारी शाळा सुरू आहेत. राज्यात खासगी शाळांची संख्या वाढत आहे. यामुळे पालक तसेच विद्यार्थ्यांचा ओढा देखील खासगी शाळांकडे जास्त आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, एखाद्या शाळेत एखही विद्यार्थी नसेल तर ती शाळा सुरु ठेवणे कठीण होते. शाळा सुरू राहिल्या तर शाळांच्या इमारतीही सुस्थितीत राहतात. विद्यार्थी नसलेल्या शाळा बंद करण्यावाचून पर्याय नसल्याने त्या बंद करण्याचा सरसकट आदेश शिक्षण खात्याने जारी केला आहे. शाळांकडे विद्यार्थी वळावेत यासाठी अनेक शाळांना पूर्व प्राथमिक विभाग जोडण्यात आले आहेत.

चतुर्थीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार भरपाई

राज्यात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या सर्व शेतकऱ्यांना चतुर्थीपूर्वी नुकसान भरपाई देणार असल्याचे आश्‍वासन मी विधानसभेच्या पटलावर यापूर्वी दिले आहे, त्यानुसार चतुर्थीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठविले जाणार आहेत,असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. यावेळी कृषी संचालक संदीप फळदेसाई व इतर खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात अनेक शेतकरी असे आहेत, ज्यांचे कृषी कार्ड नाही परंतु त्यांच्या शेतीचेही नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांनाही भरपाई देण्यात येणार असून त्यासाठी वेगळी तरतूद केली आहे. कृषी कार्ड धारक नसलेल्या शेतकऱ्यांमध्ये सुमारे ७५ लाख रूपये वितरित करण्यात येणार आहेत. यंदा सर्वांची चतुर्थी चांगली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT