Chief Minister constituency sand mining Dainik Gomantak
गोवा

Goa News: मुख्‍यमंत्र्यांच्‍या मतदारसंघातही चालते खुलेआम रेतीउत्‍खनन!

Goa News: कोणतीच कारवाई केली जात असल्‍याबद्दल संताप व्‍यक्त केला जात आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: राज्यात रेतीउत्खनन आणि वाहतुकीवर कायद्याने बंदी असली तरी अनेक ठिकाणी चोरट्या पद्धतीने रेती काढून बिनधास्तपणे वाहतूक सुरू आहे. फोंडा तालुक्यात तर मध्यरात्रीनंतर रेतीची वाहतूक सुरू होते. त्यामुळे या प्रकाराला पोलिसांचा आशीर्वाद असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बेकायदा रेतीव्यवसाय फोफावला आहे. मात्र कोणतीच कारवाई केली जात असल्‍याबद्दल संताप व्‍यक्त केला जात आहे.

फोंडा तालुक्यात खांडोळा, बेतकी, वळवई, सावईवेरे, वाघुर्मे व इतर ठिकाणी रेतीचा व्यवसाय चालतो. मात्र कायद्याने बंदी असल्याने अनेक ठिकाणी तो बंदच आहे. पण जेथे बेकायदा सुरू आहे, तेथून रात्रीच्‍या वेळीला रेतीची वाहतूक सुरू असते. या उद्योगावर बंदी असली तरी बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.

त्यात वैयक्तिक बांधकामांशिवाय पंचायत व सरकारी प्रकल्‍पांचाही समावेश आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात रेतीची आवश्‍यकता लागते. ही संधी साधून काळ्या बाजारात रेतीची अव्वाच्या सव्वा दराने विक्री केली जाते. रात्रीच्या वेळेला ही रेती पोचती केली जाते. सरकारने रेतीव्यवसाय खुला करताना निर्बंध घालूनच परवानगी देण्याची आवश्‍यकता आहे, अशी मागणी केली जात आहे. तरच या बेकायदा व्‍यवसायाला आळा बसू शकतो.

कायद्याच्‍या चौकटीत परवानगी द्या

राज्‍यात सध्या खनिज उद्योग बंद आहे. त्यातच आता गौण खनिजमालाची वाहतूकही कायद्यानुसार बंद आहे. पण रेती, चिरे, दगड यांची मोठ्या प्रमाणात गरज भासत असल्याने हे गौण खनिज उद्योग तरी व्यवस्थित कायद्याच्या चौकटीत आणावेत अशी मागणी या व्यावसायिकांनी केली आहे. या व्यवसायावर अनेक लोकांची रोजीरोटी चालते. नियम आखून रेतीउत्खनन व इतर गौण खनिज उद्योगास परवानगी दिली तर काळा बाजार चालणार नाही, असेही काहींचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT