P Chidambaram dainikgomantak
गोवा

"भाजपचा विजय साजरा करण्यासाठीच काँग्रेस नेते गोव्यात"

चिदंबरम आणि दिनेश गुंडू राव भाजपच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठीच गोव्यात

दैनिक गोमन्तक

मडगाव: सध्या राज्यात कोणाची सत्ता येणार? कोण मुख्यमंत्री पदावर बसणार? की राज्यात महाराष्ट्रासारखी महायुती येणार असे प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहेत. त्यातच राज्यात निकालाचा उत्सुकता शिगेला पोहचली असताना भाजप आणि काँग्रेस यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता काँग्रेस नेते पी चिदंबरम आणि दिनेश गुंडू राव हे गोव्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर भाजपचे गोवा प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी काँग्रेसला खोचक टोमना मारताना चिदंबरम आणि दिनेश गुंडू राव भाजपच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी गोव्यात आल्याचे म्हटले आहे. (Congress leaders P Chidambaram and Dinesh Gundu Rao has come to Goa to celebrate BJP’s victory says Urfan Mulla)

तसेच यावेळी मुल्ला यांनी काँग्रेसच्या (Congress) सध्याच्या स्थितीवर भाष्य करताना, राव यांच्या विधानाचा संदर्भ देत, काँग्रेस गैर-भाजप पक्षांशी निवडणुकीनंतर (election) युती करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

तर भाजपचे गोवा प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी ट्विट करत, “दिनेश गुंडू राव आणि पी चिदंबरम यांचे विधान हे स्पष्ट संकेत आहे की ते भाजपचा (BJP) विजय साजरा करण्यासाठीच येथे आले आहेत. 26 जागा जिंकण्याचा ब्रेव्हडो, आता भंगार TMC आणि AAP सोबत युती करू इच्छित आहेत. सध्या जे TMC आणि AAP बोलत आहेत तेच काँग्रेसही (Congress) करत आहे.

काँग्रेसच्या हालचालींना वेग

मतमोजणीपूर्वीच भाजपविरोधी पक्ष तसेच अपक्षांना सत्ता स्थापनेच्या पार्श्‍वभूमीवर युती करण्यासाठी काँग्रेसने दारे खुली केली आहेत. विधानसभा (Assembly) निवडणुकीत गोमंतकियांनी काँग्रेसला कौल दिला असल्याचा ठाम विश्‍वास असल्याने सत्ता स्थापनेवेळी मागील चूक पुन्हा होऊ नये म्हणून तीन दिवस आधीच काँग्रेसचे गोवा ज्येष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम व प्रभारी दिनशे गुंडू राव (P Chidambaram and Dinesh Gundu Rao) हे दुपारी गोव्यात दाखल झाले आहेत. दिल्लीतील पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या बैठकीनंतर सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस हालचालींना व व्यूहरचनेला वेग आला आहे. मतमोजणी होऊन सरकार (Government) स्थापन होईपर्यंत हे दोन्ही नेते गोव्यात ठाण मांडून राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budh Gochar 2026: बुधाची राहुच्या नक्षत्रात एन्ट्री, 'या' 3 राशींच्या बँक बॅलेन्सची गाडी सुस्साट; व्यापारात भरभराट अन् नोकरीत प्रमोशनचा योग

Mardol: सफर गोव्याची! ओहोळ-नाल्यांचं संगीत ऐकणारं, फुलांचा सुगंध घेऊन येणारं 'म्हार्दोळ'

Sudan Attack: सुदान पुन्हा हादरलं! जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्यांवरच काळाचा घाला; गोळीबारात 8 मुलांसह 24 निष्पाप नागरिकांचा मृत्यू

"बाबर आझमकडे सिक्स मारण्याची क्षमताच नाही...", LIVE मॅचमध्ये मोहम्मद कैफनं काढली लायकी Watch Video

Bicholim Accident: विजयनगर–कारापूर येथे भरधाव कारची पादचारी महिलेला धडक

SCROLL FOR NEXT