Goa Health Dainik Gomantak
गोवा

Goa Health: खोतिगावात कांजिण्याची साथ; आरोग्य पथक आज करणार निरीक्षण

खोतिगाव पंचायत क्षेत्रातील नागरिक कांजिण्या रोगामुळे त्रस्त झालेले आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Health: खोतिगाव पंचायत क्षेत्रातील नागरिक कांजिण्या रोगामुळे त्रस्त झालेले आहेत. तेथे मोठ्या प्रमाणात कांजिण्याची लागण झाल्यामुळे घबराट पसरली आहे. काणकोण सामाजिक आरोग्य केंद्राच्या पथकाने या भागाला भेट देऊन सर्वेक्षण केले. शुक्रवारी पणजी येथून आरोग्य केंद्राचे आणखी एक पथक या भागाला भेट देऊन निरीक्षण करणार आहे.

काणकोण आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. स्नेहा आमोणकर, डॉ. दर्शन कोरगावकर, पी. एच. एन. सुचिता देसाई, प्रशांत खोलकर, उल्हास वेळीप आजच्या निरीक्षणासाठी उपस्थित होते.

म्हालबड्डे येथे एकूण 52 घरांतील 72 कुटुंबे, बड्डे एकूण 39 घरांतील 47, अवें 27 घरांतील 31 जणांना, आवळी-ए येथील 50 घरांतील 53 लोकांना असे एकूण 169 घरांतील 203 लोकांची तपासणी करण्यात आली.

यावेळी एकूण 9 जण कांजिण्याग्रस्त असल्याचे घोषित करून त्यांना विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे.

आरोग्य पथकाने खोतिगाव भागातील म्हालबड्डे येथील अंगणवाडीला भेट देऊन पाहणी केली. तसेच बचत गटाबरोबर बैठक घेऊन घ्यावयाच्या दक्षतेसंदर्भात मार्गदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "Fu..." पराभवाच्या रागात ऋषभ पंतने ओलांडली मर्यादा; लाईव्ह मुलाखतीत वापरली आक्षेपार्ह भाषा! धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Shukra Gochar 2026: शुक्राचे आर्द्रा नक्षत्रात गोचर! 5 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस आणि सुखवृद्धी; लव्ह लाइफसाठी सुवर्णकाळ

Goa Bison Car Accident: गोव्यात धावत्या कारला गवा रेड्याची जोरदार धडक, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; चालक थोडक्यात बचावला!

VIDEO: "याच्या ओव्हरअ‍ॅक्टिंगचे 50 पैसे कापा" मोहम्मद रिझवान अन् लिटन दास यांच्यात जोरदार बाचाबाची; बांगलादेशी खेळाडूंनी उडवली खिल्ली

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेदरम्यान मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' सरकारी कर्मचाऱ्यांची लागली लॉटरी; ओल्ड पेन्शन स्कीमचा मिळणार फायदा

SCROLL FOR NEXT