Chess PlayerNitish Belurkar Dainik Gomantak
गोवा

Chess Game : नीतिश बेलुरकर हैदराबादमध्ये विजेता

रॅपिडमध्ये अव्वल, ब्लिट्झमध्ये तिसरा क्रमांक

गोमन्तक डिजिटल टीम

Chess Game : पणजी, गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) बुद्धिबळपटू नीतिश बेलुरकर याने हैदराबाद येथे झालेल्‍या अखिल भारतीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. नीतिशने स्पर्धेत आठ गुण नोंदविले.

स्पर्धेत नीतिशने आयएम कुशाग्र मोहन, आयएम ए. हरिकृष्ण, जे. रामकृष्ण, आयएम सम्मेद शेटे या खेळाडूंना हरविले. ग्रँडमास्टर कार्तिक व्यंकटरमण व आयएम व्हियानी डिकुन्हा यांना बरोबरीत रोखले.

या स्पर्धेतील चमकदार कामगिरीमुळे नीतिशला ३०.४ रेटिंग गुणांची कमाई करता आली. व्हियानी डिकुन्हास उपविजेतेपद, ए. हरिकृष्णला तिसरा क्रमांक मिळाला.

हैदराबादमधील या स्पर्धेत रॅपिडपूर्वी झालेल्या ब्लिट्झ प्रकारातील स्पर्धेत नीतिशने आठ गुणांसह तिसरा क्रमांक

मिळविला होता. तो कुजिरा येथील एस. एस. धेंपो महाविद्यालयात शिकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa News: पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह, हत्येचा संशय; वाचा गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT