Lok Sabha Election Dainik Gomantak
गोवा

Lok Sabha Election: निवडणूक मतपत्रिकेवर घ्या!

Lok Sabha Election: फोंड्यात मागणी: इव्हीएम मशीनद्वारे मतदारांची फसवणूक

दैनिक गोमन्तक

Lok Sabha Election: भारतातील लोकांना इव्हीएम मतदान यंत्राद्वारे फसवण्याचा प्रकार चालला असून येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान पत्रिकेचा वापर व्हायला हवा, अशी आग्रही मागणी इव्हीएमविरोधी नागरिकांनी फोंड्यात आज शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील भानुप्रताप सिंग तसेच डी. सी. कपिल यांच्यासह अतुल पटेल, मारियानो फेर्रांव, तनोज अडवालकर, रामकृष्ण जल्मी व सर्फराज आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत इव्हीएम या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदारांची कशी फसवणूक होते, त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.

इव्हीएम मशीन तयार करणाऱ्या कंपनीची माहिती आरटीआयमार्फत मागवण्यात आल्यानंतर हा घोटाळा उघड झाल्याचे भानूप्रताप सिंग यांनी सांगितले.

इव्हीएम नकोच, मतपत्रिकेचा वापर व्हावा असा आग्रह धरणाऱ्या भारतातील जागृत आणि सजग नागरिकांनी ९६६७७२२०६२ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकांचे आयोजन

येत्या २५ फेब्रुवारीला दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेराव घालण्यात येणार असून यावेळी बहुसंख्येने लोकशाही मानणाऱ्या मतदारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले. या इव्हीइमच्या घोटाळ्याची माहिती देण्यासाठी दक्षिण आणि उत्तर गोव्यात बैठका आयोजित करण्यात आल्या असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Jatra: म्हापशात प्रशासनाचा बडगा! श्री बोडगेश्वर जत्रोत्सवातील जायंट व्हील्ससह 20 राईड्स सील; सुरक्षेच्या कारणास्तव मोठी कारवाई

पिढ्यांमधील अंतर आणि मनाचा समतोल: सुखी म्हातारपणाची गुरुकिल्ली

लग्नाच्या मांडवात राडा! नवऱ्या मुलाला किस करणाऱ्या 'एक्स'ला नवरीनं भर मंडपात धोपटलं; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

India Pakistan Nuclear List: तणावाच्या वातावरणातही भारत-पाकिस्तानने जपली 35 वर्षांची परंपरा; अणुयादीच्या देवाणघेवाणीने जगाचे वेधले लक्ष

बांगलादेशात क्रूरतेचा कळस! 50 वर्षीय हिंदू व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी हल्ला करुन दिलं पेटवून; 31 डिसेंबरची रात्र ठरली 'काळरात्र'

SCROLL FOR NEXT