Chavat E- Bazar Goa Govt to launch mobile App 
गोवा

गोवा सरकारचा यंदा 'चवथ ई-बाजार', गणेश चतुर्थीत मोबाईल अ‍ॅपद्वारे ऑनलाईन मागवा खाद्यपदार्थ

राज्य सरकारच्या वतीने चवथ ई-बाजार हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

Pramod Yadav

Chavat E- Bazar Goa Govt to launch mobile app: गोव्यात गणेशोत्सवाचे मोठे महत्व आहे. राज्यात चवथ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या उत्सवाला विविध खाद्यपदार्थ केले जातात. या खाद्यपदार्थांच्या विक्रीतून ग्रामीण भागातील लोकांसाठी अर्थीक उत्पन्न मिळवून देणारा महत्वाचा सण मानला जातो.

राज्य सरकारच्या वतीने चवथ ई-बाजार हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यंदा ऑनलाईन पद्धतीने चवथ बाजार भरवण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

चवथ ई-बाजारासाठी अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज (गुरुवारी, दि.14) मडगावच्या रवींद्र भवन येथे या अ‍ॅपचे लॉन्चिग केले जाणार आहे.

गोव्यात गणेश चतुर्थीच्या काळात विविध खाद्यपदार्थ तयार केले जातात. ग्रामीण भागातून या खाद्यपदार्थांची विक्री करुन आर्थिक उत्पन्न मिळवले जाते. यासाठी गेल्या वर्षी सरकारच्या वतीने चवथ बाजार आयोजित केला होता. त्याच पद्धतीने यावर्षी देखील चवथ बाजार आयोजित केला जाणार असून तो ऑनलाईन पद्धतीचा असणार आहे.

खाद्यपदार्थ विक्रीसाठी आता स्टॉल न उभारता जवळच्या दुकानात जमा करुन अ‍ॅपच्या माध्यमातून त्याची विक्री केली जाईल. दुकानात ओळखपत्र आणि बँक खात्याची माहिती जमा केल्यानंतर महिलांना एक कोड मिळेल.

ऑनलाईन विक्री झालेल्या खाद्यपदार्थाचा आर्थिक फायदा संबधितांना दुकानदारांकडून घेता येणार आहे. 18 सप्टेंबरपर्यंत हा चवथ ई-बाजार सुरु राहणार असल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT