Chargesheet filed in Colva police accident case Dainik Gomantak
गोवा

कोलवा पोलीस अपघात प्रकरणी आरोपपत्र दाखल

यात दोन पोलिस कॉन्स्टेबलचा झाला होता मृत्यू

दैनिक गोमन्तक

मडगाव : कोलवा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस हवालदारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी मंगळवारी क्रेग रॉड्रिग्स (31) या कार चालकावर आरोपपत्र दाखल केले. रॉड्रिग्स हा मडगाव येथील रहिवासी होता. 16 जानेवारी रोजी रात्री हा अपघात घडला होता.

या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी मडगाव (Margao) येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर (court) आरोपपत्र सादर केले आहे.

दक्षिण गोव्यातील सुरावली येथे हा अपघात झाला होता. रात्रीच्या वेळी नाकाबंदीच्या ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना भरधाव कारने उडवल्याची धक्कादायक घटना घडली होती. या भरधाव कारच्या घडकेत शैलेश गावकर आणि विश्वास देयकर या दोघा पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला होता. दरम्यान कार चालकाला गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

राज्यात विधानसभा निवडणूकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर गोव्यात (goa) जागोजागी गोवा पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला होता. आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांची टीम तैनात करण्यात आली होती. याचदरम्यान कामावर रुजू असताना दोन पोलिसांसोबत (police) अपघात झाला होता. या घटनेचे पडसाद पूर्ण राज्यात उमटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT