Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: गौरवविरोधात आरोपपत्र दाखल; दीक्षा गंगवार खून प्रकरण

Cuncolim Police: कुंकळ्‍ळी पोलिसांनी न्‍यायालयात आरोपपत्र दाखल केले

गोमन्तक डिजिटल टीम

आपल्‍या अनैतिक संबंधांची माहिती उघड्यावर येऊ नये यासाठी आपली पत्‍नी दीक्षा गंगवार हिला काब-द-राम समुद्रात बुडवून तिचा खून केल्‍याचा आरोप असलेला हॉटेल मॅनेजर गौरव कटियार (२९) याच्‍याविरोधात कुंकळ्‍ळी पोलिसांनी न्‍यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

२१ जानेवारी २०२४ या दिवशी ही खुनाची घटना घडली होती. काेलवा येथील एका तारांकित हॉटेलात व्‍यवस्‍थापक म्‍हणून काम करणारा गौरव हा मूळ उत्तरप्रदेश येथील असून त्‍याची पत्‍नी दीक्षा ही गावात राहात होती.

मात्र, त्‍यावेळी ती आपल्‍या पतीकडे गोव्‍यात राहण्‍यासाठी आली असता २१ जानेवारी रोजी गौरवने तिला गोव्‍याची सैर घडवून आणण्‍याच्‍या बहाण्‍याने काब-द-राम येेथे आणले आणि तेथील खडकाळ अशा जागेत नेऊन पाण्‍यात बुडवून तिचा खून केला.

सुरवातीला हा प्रकार अनैसर्गिक मृत्‍यूचा वाटला. मात्र, कुंकळ्‍ळी पोलिसांनी सखोल चौकशी केल्‍यानंतर हा खुनाचा प्रकार हे उघड झाले होते. कुंकळ्‍ळीचे पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस यांनी या प्रकरणात तपास केला होता.

अनैतिक संबंधांची किनार

गौरवचे जरी लग्‍न झालेेले असले तरी त्‍याचे आणखी एका महिलेशी अनैतिक संबंध होते. गोव्‍यात आल्‍यावर त्‍याच्‍या पत्‍नीला या संबंधांची कुणकुण लागली होती. त्‍यामुळे त्‍यांच्‍यात वादही होत होते. आपल्‍या अनैतिक संबंधांची पत्‍नीकडून वाच्‍यता होण्‍याची भीती असल्‍याने त्‍याने तिचा काटा काढला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT