Police Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case : शिवोली येथे 3 लाखांचे चरस जप्त, एकाला अटक

शिवोली येथील फुटसल मैदानाजवळ पोलिसांनी छापेमारी केली

गोमन्तक डिजिटल टीम

कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गोवा पोलीस नेहमीच सतर्क राहत असून पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचा गोवेकरांना वारंवार चांगला अनुभव येत आहे. कामाप्रती निष्ठा असल्याने गुन्ह्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश येत आहे. हणजुणे पोलिसांनी देखील अशीच एक वाखडण्याजोगी कामगिरी केली आहे.

हणजुणे पोलिसांनी ड्रग्जच्या छाप्यात चरससह शिवोली येथील एकाला अटक केल्याची घटना घडली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी जीवबा दळवी, पीआय प्रशाल एन. देसाई यांच्या नेतृत्वाखाली अंजुना पोलिसांच्या पथकाने 31 जानेवारी रोजी सदरची कारवाई केलीय. शिवोली येथील फुटसल मैदानाजवळ सायंकाळी पोलिसांनी हि छापेमारी केली. त्यादरम्यान आरोपी विनोद साळगावकर (वय 54 रा.शिवोली) याच्या ताब्यात 680 ग्रॅम वजनाचे चरस हे सापडले.

या जप्त केलेल्या चरसची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत रु. 3,41,000/- एवढी असून नारकोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्याच्या कलम 20 अन्वये आरोपीला अटक करण्यात आली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. छापा टाकणाऱ्या पथकात पीएसआय फ्रान्सिस्को झेवियर, हवालदार रुपेश आजगावकर, प्रवीण पाटील, लक्ष्मण सावल देसाई, आदर्श नागेकर आदींचा समावेश होता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT