Goa Election Vote Counting News  Dainik Gomantak
गोवा

Goa Vote Counting Day: मतमोजणीमुळे दक्षिण गोव्‍यात आज वाहतुकीमध्‍ये बदल

सामान्य व्यक्तींना मतमोजणी ठिकाणी जाण्यास मनाई

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: विधानसभा निवडणुकीची दक्षिण गोव्‍यातील मतमोजणी कोंब-मडगाव येथील विद्या विकास मंडळाच्या प्रकल्पात सकाळपासून होणार आहे. त्‍यामुळे या परिसरात गर्दी टाळण्यासाठी येथील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. सामान्य व्यक्तींना मतमोजणी ठिकाणी जाण्यास मनाई असेल. केवळ मतमोजणीसाठी नेमलेले सरकारी कर्मचारी, पोलिंग एजंट व उमेदवारांनाच प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती दक्षिण गोवा वाहतूक पोलिस उपअधीक्षक धर्मेश आंगले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. यावेळी एकूण 107 वाहतूक पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर येथील वाहतूक पूर्ववत करण्यात येणार असल्याचे आंगले यांनी सांगितले. यात खारेबांधपासून पेडा, रेल्वे फाटकमार्गे येणारी आणि जाणारी वाहतूक तात्पुरती ओव्हरब्रीजवरून वळविण्‍यात येणार आहे. या पुलावर सध्या सुरू असलेले दुरुस्तीचे काम त्या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी येथील कामाला पुन्हा सुरूवात करण्यात येणार आहे.

मतमोजणी दिवशी म्‍हणजे उद्या गुरुवारी विद्या विकास मंडळ परिसरातील रहिवाशांना तसेच शालेय कर्मचारी व मुलांना ओळखपत्राच्या आधारावर प्रवेश देण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

SCROLL FOR NEXT