IMD Goa  Dainik Gomantak
गोवा

IMD Goa: गोव्यात आज पावसाची शक्यता; वेधशाळेचा अंदाज

वाढत्या उष्म्यात मिळणार दिलासा

Akshay Nirmale

IMD Goa: मार्च महिन्यातील गोव्याचे तापमान नवनवे विक्रम नोंदवत असताना आता आगामी काही दिवस मात्र गोव्यात पावसाचा शिडकावा होणार आहे. गोव्यात आज, बुधवारी (ता. 15) पावसाचा अंदाज गोवा वेधशाळेने वर्तवला आहे.

तसेच आगामी काही दिवसही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 15 ते 19 मार्च या काळात पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

आगामी काही दिवस पाऊस होणार असल्याचा अंदाज गोवा वेधशाळेने वर्तविला आहे. काही भागात तुरळक सरी तर काही ठिकाणी गडगडाटी पाऊस होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. यामुळे कडक उन्हामुळे त्रासलेल्या नागरिकांना दिलासा मिळू शकतो.

गोव्यात वातावरणीय आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. तसेच, कोकण कर्नाटक भागात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असल्याने आगामी दिवसात राज्यात पावसाची शक्यता आहे. या काळात राज्यातील कमाल तापमानात 2 ते 3 अंशाने घट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गोव्यात रविवारी काणकोण येथे सर्वाधिक 39.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: चामुंडेश्वरी देवस्थानात 'जायांची महापूजा'उत्साहात

Pernem: 'बाहर आ.. तेरे को ठोक दूंगा'! दिल्लीकर बाप-लेकावर कारवाई करा; पं.सचिव संघटनेची मागणी

Goa ST Reservation: गोव्‍यात ‘एसटीं’च्या राजकीय आरक्षणासाठी 2032 ची प्रतीक्षा? तज्‍ज्ञांनी व्‍यक्‍त केली शक्‍यता

Goa Marathi Film Festival: गोवा मराठी चित्रपट महोत्सवात कोणते खास सिनेमे पहाल? कोणत्या कलाकारांना भेटाल? वाचा माहिती..

Goa Politics: खरी कुजबुज; मर्दनगडाचे संवर्धन करणार कसे?

SCROLL FOR NEXT