IIT Goa Dainik Gomantak
गोवा

Director of IIT Goa: IIT गोव्यासाठी आव्हाने कायम, नवनियुक्त संचालक पशुमार्थी शेषू यांनी पद नाकारले

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (IIT) 19 सप्टेंबर 2022 रोजी, धारवाडचे संचालक पशुमार्थी शेषू यांची IIT गोवा संचालक म्हणून नियुक्ती करण्याचा आदेश जारी केला होता.

दैनिक गोमन्तक

पणजी: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (IIT) 19 सप्टेंबर 2022 रोजी, धारवाडचे संचालक पशुमार्थी शेषू यांची IIT गोवा संचालक म्हणून नियुक्ती करण्याचा आदेश जारी केला होता. तथापि, शेषू यांनी आता नियुक्ती घेण्यास नकार दिला आहे. सध्या प्राध्यापक बी के मिश्रा आयआयटी गोवाच्या कामकाजावर देखरेख करत आहेत.

(Challenges remain for IIT Goa newly appointed director Pashumarthi Seshu declines post)

राज्यात 2016 मध्ये स्थापन झालेल्या संस्थेसाठी तसेच कायमस्वरूपी कॅम्पससाठी जमीन मिळवण्यासाठी राज्य सरकारला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, यामुळे आयआयटी गोवा चांगलेच चर्चेत आहे.

“शेषू यांनी आयआयटी धारवाडच्या उभारणीत मदत केली आहे. यामुळेच ते कदाचित तिथेच आयआयटी विस्ताराला प्राधान्य देत असतील. आयआयटी गोवा हे नवीन संचालकांसमोर मोठी आव्हाने म्हणूनही पाहिले जात आहे. कारण, ते तात्पुरत्या कॅम्पसमधून कार्य करते आणि यामुळेच संस्थेच्या कार्यावर आणि विस्तारावर मर्यादा येत आहेत.

मिश्रा यांचा IIT गोवा संचालक म्हणून कार्यकाळ 8 मार्च 2021 रोजी संपला असुन, नवीन संचालकाची नियुक्ती होईपर्यंत ते मुदतवाढ देत होते. शेषू यांना नवीन संचालक म्हणून घोषित केल्यानंतर, मिश्रा यांना त्यांच्या कर्तव्यातून मुक्त केले जाणार होते. मात्र आता शेषू यांनी नकार दिल्यामुळे विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. आयआयटी गोवाचा पदभार कोणाकडे आहे याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा नाही, आयआयटीसाठी मंत्रालयाने नवीन उमेदवार शोधणे अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

1106 च्या ताम्रपटात उल्लेख असलेला गंडगोपाळ तलाव, करमळीचे सुलभातीचे तळे; गोवापुरीच्या जलव्यवस्थापनाचा लौकिक पुन्हा गवसेल?

Madhav Gadgil: खाण परिस्थिती नियंत्रणात आहे की नाही? गोव्यावर भरभरून प्रेम करणारे 'माधव गाडगीळ'

Kundaim Fire: कुंडई वीजतारांमुळे वाढला धोका! आगीच्या घटनांमध्ये वाढ; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

खोटी कागदपत्रं वापरून घेतला पासपोर्ट, गोव्यात करायची सलूनमध्ये काम; फिलिपिन्स महिलेसह स्थानिकाच्या आवळल्या मुसक्या

"वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करणार"! रितेश नाईकांनी दिली ग्वाही; पांचमे- खांडेपार तळ्याच्या संवर्धन कामाचे केले उद्‍घाटन

SCROLL FOR NEXT